Tuesday, January 19, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Gadchiroli : 'कोरोना उपाययोजनेसाठीचा निधी कमी पडू देणार नाही'!

Gadchiroli : ‘कोरोना उपाययोजनेसाठीचा निधी कमी पडू देणार नाही’!

Related Story

- Advertisement -

कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण परिस्थितीची माहिती तसेच प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या उपाययोजनांसंदर्भात आढावा घेण्याकरता आज गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला नगरविकास मंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रेमदेसिव्हीर व टोक्लिझुमब ही औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही देत नगरविकास खात्याकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींना विशेष निधी जाहीर करताना मंत्रालयातून काम करत असलो तरी गडचिरोली जिल्ह्यावर विशेष लक्ष असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे

बैठकीतील ठळक मुद्दे –

 • मुंबईत मंत्रालयात असलो तरी माझे गडचिरोली जिल्ह्यावर विशेष लक्ष असते
 • पालकमंत्री यांच्याकडून जिल्हा प्रशासनातील कोविड योद्धासाठी 100 pulse oxymeter भेट
 • तसेच 2 हजार मास्क आणि 5 हजार लिटर हँड सॅनिटीझर तर 10 हजार लिटर सोडियम हायपोक्लोराइड जिल्हा प्रशासनास सुपूर्द
 • antigen test आणखी मोठ्या प्रमाणावर वाढविण्याचे पालकमंत्री यांचे प्रशासनाला निर्देशसुदैवाने सर्वांच्या सहकार्याने आणि मेहनतीने समूह संसर्ग रोखण्यात राज्य सरकारला येत आहे
 • मृत्यू दर कमी व्हावा यासाठी राज्य सरकार काम करत आहे
 • कोरोनाचा रुग्णवाढीचा दर रोखण्यासाठी chase the virus या मिशन अंतर्गत राज्य सरकार काम करत आहे
 • गडचिरोली जिल्ह्यात देखील टेस्ट वाढवून आपण आता chase the virus मिशन सुरू करत आहोत
 • माझ्या नगरविकास खात्यातुन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतना विशेष निधी देणार
 • कोरोना उपाययोजना साठीचा निधी कमी पडू देणार नाही
 • कोविडग्रस्त रुग्णांसाठी अंडी – दूध देण्याचा निर्णय
 • जिल्ह्यातील सर्व महावितरणने
 • वन विभागने जिल्ह्यात रस्ते /पूल कामे करणाऱ्या कंत्राटदार यांचे वर गुन्हे दाखल करू नयेत
 • रेमडीसीविर / टोक्लीझुमब इंजेकॅशन उपलब्ध करून देणार
 • पालकमंत्री यांच्या हस्ते तथा डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन , ठाणे यांच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनातील कोविड योद्धासाठी 100 pulse oxymeter भेट
 • तसेच 2 हजार मास्क आणि 5 हजार लिटर हँड सॅनिटीझर तर 10 हजार लिटर सोडियम हायपोक्लोराइड जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द
 • कामचुकार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार
 • मेडिगड्डा मुळे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा आढावा घेऊन मदत करण्याचे निर्देश
 • रस्ते – पूल आदी ज्या कामांना राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे, अशी कामे तातडीने पूर्ण करा
 • वन विभागातील नियमांचा बागुलबुवा बाजूला ठेवून विकास कामे तात्काळ मार्गी लावा

हेही वाचा –

- Advertisement -

मटका किंग जिग्नेश ठक्कर : बालपणीच्या मित्राने आर्थिक वादातून केली हत्या

- Advertisement -