घरमहाराष्ट्रबालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी 'मेळघाट अॅक्शन प्लॅन'

बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी ‘मेळघाट अॅक्शन प्लॅन’

Subscribe

मेळघाटातील कुपोषण, माता मृत्यू आणि बालमृत्यू रोखण्यासाठी अॅक्शन प्लॅन राबवून मृत्यूचे प्रमाण रोखण्यावर जास्तीत जास्त भर देण्यात येणार असल्याची ग्वाही आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे

मेळघाटातील कुपोषण, माता मृत्यू आणि बालमृत्यू रोखण्यासाठी अॅक्शन प्लॅन राबवून मृत्यूचे प्रमाण रोखण्यावर जास्तीत जास्त भर देण्यात येणार असल्याची ग्वाही आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. २२ आणि २३ फेब्रुवारी, २०१९ असे २ दिवस आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आरोग्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मेळघाट दौरा केला.

मोबाईल किंवा वायरलेस यंत्रणा उभारणार

मेळघाटात आरोग्य यंत्रणा सक्षमपणे राबवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास होणे गरजेचे आहे. रुग्ण आणि आरोग्य यंत्रणेतील संपर्क हा देखील मोठा प्रश्न आहे. संपर्क साधनांअभावी कमी अंतरावरील रुग्णांनाही आरोग्य सुविधा पुरवण्यात अडचणी येतात. त्यामुळे मोबाईल किंवा वायरलेस यंत्रणा उभारण्याबाबत विचार व्हावा, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. दुर्गम भागात तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा मिळावी, यासाठी ग्रामीण रुग्णालय स्तरावर शिबिरे घेण्यात येतील. जिथे संपर्क यंत्रणा नाही तेथे रुग्णवाहिकेला बोलावण्यासाठी वनविभागाच्या संपर्क यंत्रणेचा वापर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. मेळघाटात मोठ्या रुग्णवाहिकेपेक्षा बाईक ॲम्ब्युलन्स प्रभावी ठरू शकतील. यासाठी आवश्यक तेवढ्या बाईक ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.”

- Advertisement -

महिला-बालकांना पोषक आहार देणार 

आरोग्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, “महिला आणि बालकांना कुपोषणापासून रोखण्यासाठी गहू, तांदूळ सोबतच डाळ आणि तेल असा पूरक आहार सार्वजनिक वितरण प्रणालीतून देण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांशी चर्चा करू. आदिवासी भागातील रुग्ण बिगर आदिवासी भागात उपचारासाठी गेल्यास त्याला आदिवासी भागातील लाभ मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत. या भागातील नागरिकांचे हिमोग्लोबीन प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी डोस देण्यात यावेत. दुर्गम भागातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी नेब्युलायझर, वार्मर आदींचे वाटप करण्यात आले आहे. अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, आशा यांच्या मदतीने एकत्रित येऊन समन्वयाने कार्य केल्यास कुपोषण, बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.”

विविध शिबिरांचे आयोजन 

“दुर्गम भागात तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा मिळावी यासाठी ग्रामीण रुग्णालयस्तरावर शिबीर घेण्यात येतील. पावसाळ्याच्या काळात शिबिराचा लाभ होत असल्याने त्या ठिकाणी डॉक्टरांच्या राहण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील”, असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -