घरCORONA UPDATECorona: मर्सिडिज बेन्झ पुण्यात १५०० खाटांचे तात्पुरते हॉस्पिटल उभारणार

Corona: मर्सिडिज बेन्झ पुण्यात १५०० खाटांचे तात्पुरते हॉस्पिटल उभारणार

Subscribe

मर्सिडिज बेन्झ या कंपनीने बुधवारी कोरोना रुग्णांसाठी पुण्यामध्ये १५०० खाटांचे तात्पुरते हॉस्पिट उभारण्याची घोषणा केली. हे हॉस्पिटल पुण्यातील चाकण विभागात उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मर्सिडिज बेन्झ या कंपनीने बुधवारी कोरोना रुग्णांसाठी पुण्यामध्ये १५०० खाटांचे तात्पुरते हॉस्पिट उभारण्याची घोषणा केली. हे हॉस्पिटल पुण्यातील चाकण विभागात उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी त्यांचा एक दिवसाचा पगार स्वेच्छेने राज्य सरकार सहायता निधीला दिला आहे. पुण्यातील चाकणमध्ये या कंपनीचे मॅन्युफॅक्चरींग आणि कॉर्पोरेट ऑफिस असे दोन्ही सेटअप आहेत. पुण्यातील चाकण खेडच्या म्हाळुंगे-इंगळे गावात हे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल बनवण्यात येणार असल्याचे या कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – तबलिगी जमातमुळे कोरोनाचे रुग्ण वाढले, केंद्र सरकारचा धक्कादायक दावा

- Advertisement -

राज्यात कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ 

राज्यात सध्या कोरोनाबाधित ३३ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील बाधित रुग्णांची संख्या ३३५ वर पोहोचली आहे. बुधवारी सापडलेल्या रुग्णांमध्ये ३० रुग्ण मुंबईचे, दोन पुणे आणि बुलढाण्याच्या एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच तिघांच्या मृत्यूंची नोंद झाल्याने मृतांचा आकडा १३ वर पोहोचला आहे. मृत्यू झालेल्या तिन्ही रुग्णांचा कुठेही परदेशी प्रवास केल्याचा इतिहास नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी त्यात ३३ नव्या रुग्णांची भर पडली. तर तीन जणांचा मृत्यू झाला. यातील दोन मृत्यू मुंबईतील असून एक व्यक्ती ७५ वर्षीय तर दुसरा ५१ वर्षीचा आहे. तर मृत झालेली तिसरी व्यक्ती पालघरमधील असून ती ५० वर्षीय आहे. मृत्यू झालेले तिन्ही पुरुष असून त्यांचा कुठेही परदेशी प्रवास केल्याचा इतिहास नाही. आतापर्यंत राज्यात करोनामुळे एकूण १३ मृत्यू झाले आहेत, असे मंत्री टोपे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -