घरमहाराष्ट्र#MeToo : साजिद खान, आलोकनाथ यांना नोटीस

#MeToo : साजिद खान, आलोकनाथ यांना नोटीस

Subscribe

आलोकनाथ आणि निर्माता साजिद खान यांना FWICE अर्थात फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडियानं नोटीस बजावली आहे. लैंगिक शोषणाच्या आरोपासंदर्भात स्पष्टीकरण देण्याचं या नोटीसीमध्ये म्हटलं आहे.

लैंगिक शोषणाचे आरोप असलेले संस्कारी बाबु आलोकनाथ आणि निर्माता साजिद खान यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. #MeToo अंतर्गत साजिद खान, आलोकनाथ यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. त्यासंदर्भातील आपली बाजू मांडण्याकरता किंवा आरोपांवर स्पष्टीकरण देण्याकरता साजिद खान, आलोकनाथ यांना FWICE अर्थात फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पॉलनं ही नोटीस पाठवली आहे. दरम्यान साजिद खान याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर हाऊसफुल्ल – ४मधून त्याची गच्छिंती करण्यात आली आहे. तर आलोकनाथ यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले असून विंटा नंदाला त्यांना कायदेशीर नोटीस देखील पाठवली आहे. साजिद खानची बहिण नृत्य दिग्दर्शिका फराह खाननं साजिद तु चुकलास असं म्हटलं आहे. सध्या #MeToo अंतर्गत प्रत्येक क्षेत्रातून स्त्रिया आता समोर येत असून त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल बोलताना दिसत आहेत.

वाचा – #Metoo : ‘१० वर्षानी आवाज उठवणं चुकीचं’

#MeToo बाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका

#MeTooबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी केली गेली. पण, न्यायालयानं याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली आहे.

- Advertisement -

वाचा – #MeToo मोहिमेवर ए आर रहमानने दिली प्रतिक्रिया

अनेकांनी केलं #MeTooबाबत भाष्य

तनुश्री दत्ता – नाना पाटेकर प्रकरणानंतर अनेकांनी आता #MeTooच्या माध्यमातून त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत भाष्य केले आहे. दरम्यान, त्यावरून देखील सध्या दोन गट पडल्याचं चित्र दिसत आहेत. केवळ एक बाजू ऐकूण निर्णय घेऊ नका असे मत देखील आता मांडले जात आहे. तर अनाथांची माय सिंधुताई सकपाळ यांनी देखील १० वर्षानंतर का बोलता? असा सवाल केला आहे. #MeTooनंतर कामाच्या ठिकाणी विशाखा समिती नेमण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

वाचा – #Metoo चळवळीचा खरा अर्थ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -