#MeToo : राजकुमार हिरानींवर लैंगिक शोषणाचे आरोप

#MeTooचं वादळ अद्याप देखील थांबताना दिसत नाही. कारण, आता प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानींवर देखील लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. 

Mumbai
Rajkumar Hirani
फोटो सौजन्य - The Indian Express

#MeTooचं वादळ अद्याप देखील थांबताना दिसत नाही. कारण, आता प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानींवर देखील लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. हिरानींसोबत काही चित्रपटांमध्ये सहदिग्दर्शिका म्हणून काम करणाऱ्या महिलेने हे आरोप केले आहेत. मार्च २००८ ते सप्टेंबर २०१८ या काळात राजकुमार हिरानी यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप या  महिलेनं केला आहे. दरम्यान, एका मेलद्वारे हा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, या महिलेनं हिरानी यांच्यासोबत दिग्दर्शक, निर्माते विधू विनोद चोप्रा यांना देखील हा मेल पाठवला आहे. राजकुमार हिरानी यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.

वाचा – #MeTooचा जाळ लावून तनुश्री निघाली अमेरिकेला

काय म्हणणं आहे या महिलेचं?

राजकुमार हिरानी यांनी आपल्यावर अश्लिल शेरेबाजी केली. त्यानंतर त्यांनी माझे लैंगिक शोषण करण्यास सुरूवात केल्याचं या महिलेनं म्हटलं आहे. तसेच जर याची वाच्यता झाल्यास चित्रपट काढून घेतला जाईल अशी धमकी देखील यावेळी हिरानी यांनी दिली. पण, आपल्याकडे असणारे काम जाईल त्यामुळे आपण यावर काहीही बोललो नाही असं या महिलेचं म्हणणं आहे. सहा महिने आपलं लैंगिक शोषण सुरू होतं असं या महिलेनं म्हटलं आहे. पण, राजकुमार हिरानी यांनी मात्र हे सारे आरोप फेटाळून लावले आहेत.

अनेक दिग्गजांवर आरोप

दरम्यान, #MeToo अंतर्गत आात्तापर्यंत नाना पाटेकर, चेतन भगत, अलोक नाथ, सुहेल सेठ, साजिद खानवर देखील लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. त्यानंतर आता राजकुमार हिरानी यांच्यावर देखील आरोप झाल्यानं बॉलिवुडमध्ये खळबळ उडाली आहे. पण, राजकुमार हिरानी यांनी मात्र हे सारे आरोप फेटाळून लावले आहेत.

वाचा – #metoo : राणीच्या वक्तव्यावर कंगनाने दिली ‘ही’ प्रतिक्रिया!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here