घरCORONA UPDATEक्वारंटाईनसाठी म्हाडा देणार ६२५ घरे!

क्वारंटाईनसाठी म्हाडा देणार ६२५ घरे!

Subscribe

कोरोनाच्या संकट काळात मुंबईकरांच्या मदतीसाठी तीन ठिकाणी ६२५ घरांचा शोध घेण्यात म्हाडाला यश आले आहे.

कोरोनाच्या संकट काळात मुंबईकरांच्या मदतीसाठी तीन ठिकाणी ६२५ घरांचा शोध घेण्यात म्हाडाला यश आले आहे. कोव्हिड १९ च्या संकटाच्या काळात ही घरे क्वारंटाईनसाठी देण्यात येणार आहेत. कांदिवली, चारकोप आणि मानखुर्द अशा तीन ठिकाणी ही घरे आहेत. मानखुर्दच्या पीएमजीपी कॉलनी येथे म्हाडाची २६५ घरे आहेत. तर चारकोप येथे १७० घरे आहेत. उर्वरीत एकुण १९० घरे ही कांदिवलीच्या महावीर नगर येथे आहेत.

म्हाडाकडून ही घरे कोरोनाच्या संकटकाळात लोकांना क्वारंटाईन करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे असे म्हाडाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ज्याठिकाणी घरांचे बांधकाम काम पुर्ण झाले आहे. अशा ठिकाणी आम्ही घरे उपलब्ध करून देत आहोत. बिंबीसार नगर, चारकोप, मानखुर्द, गोरेगाव यासारख्या जागांच्या उपलब्धतेची माहिती आम्ही उपनगर जिल्हाधिकारी यांनाही दिली आहे, असे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले. गरज भासल्यास ही घरे उपलब्ध करून देण्यात येतील असे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात म्हाडा हे मुख्य घरकुल प्राधिकरण आहे. मुंबईसह राज्यातील इतर शहरात म्हाडाने लॉटरी पद्धतीने घरे उपलब्ध करून दिली आहे. आता कोरोनाच्या संकट काळात बांधकाम पुर्ण झालेली, पण लॉटरी न काढण्यात आलेल्या घरांसाठी म्हाडाकडूनचा हा पर्याय मुंबई उपनगरात उपलब्ध आहे. मुंबई महापालिका आयुक्तांनी मंगळवारी दिलेल्या आदेशानुसार मुंबई शहरातील मोकळ्या घरगुती इमारती, लॉज, हॉटेल्स, धर्मशाळा, क्लब, प्रदर्शन केंद्र, कॉलेज, हॉस्टेल, डॉर्मिटरीज, राहण्याची व्यवस्था असलेली जहाजे, लग्नाचे हॉल, जिमखाना, बॅंक्वेट हॉल आदींना आता जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. कोरोना पॉझिटीव्ह असणाऱ्या लोकांसाठी याठिकाणी क्वारंटाईनची व्यवस्था करण्यात येणार आहे.

मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरामध्ये लोक आपल्या दैनंदिन गरजांसाठी विविध गोष्टींचा एकत्रितपणे वापर करतात. त्यामुळेच मुंबईत करोना पॉझिटीव्हची संख्या वाढत चालली आहे. खुद्द महापालिका आयुक्तांनीही ही गोष्ट कबुल केली आहे. म्हणूनच करोनाची लक्षणे असलेल्याच्या संपर्कात होऊन लागण होण्याचा धोका अधिकच वाढत आहे असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. मुंबईत एकुण २.१० लाख घरे ही विक्रीशिवाय आहेत. मुंबईत एकुण असणाऱ्या घरांपैकी ६० टक्के घरे ही वापराशिवायच आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -