घरमहाराष्ट्रएमएचटी सीईटीच्या परीक्षा १ ऑक्टोबरपासून

एमएचटी सीईटीच्या परीक्षा १ ऑक्टोबरपासून

Subscribe

एमएचटी-सीईटीच्या परीक्षा १ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, २० ऑक्टोबरपर्यंत चालणार आहेत. त्यामुळे सुमारे सात लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या एमएचटी-सीईटीच्या परीक्षांचे वेळापत्रक ९ ऑगस्टला राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) वतीने जाहीर करण्यात आल्या. एमएचटी-सीईटीच्या परीक्षा १ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, २० ऑक्टोबरपर्यंत चालणार आहेत. त्यामुळे सुमारे सात लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती व प्रवेशपत्रासाठी विद्यार्थ्यांना सीईटीच्या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

राज्यातील इंजिनीअरिंग, फार्मसी, कृषी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलकडून दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. मात्र यंदा कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे जुलैमध्ये होणार्‍या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होती. मात्र आता या परीक्षेचे नवे वेळापत्रक सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आले. १ ऑक्टोबरपासून सुरू होणारी ही परीक्षा दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात पीसीबी (फिजिक्स-केमिस्ट्री-बायोलॉजी) या ग्रुपच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. तर दुसर्‍या टप्प्यात पीसीएम (फिजिक्स-केमिस्ट्र-मॅथ्स) या ग्रुपमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत. पीसीबी ग्रुपची परीक्षा १,२,४,५,६,७,८,९ या तारखांना तर पीसीएम ग्रुपच्या परीक्षा १२,१३,१४,१५,१६,१९,२० या तारखांना होणार आहेत. १३ विविध सीईटीसाठी राज्यातून ६ लाख ९२ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. यापैकी सर्वाधिक पाच लाख ३२ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटीसाठी नोंद केली आहे. इंजिनियरींग, वैद्यकीय, औषधनिर्माण शास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा महत्त्वाची आहे. परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असून, यंदा परीक्षा तालुकास्तरावर घेण्यात येणार आहेत. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक व माहितीसाठी सीईटी सेलच्या www.mahacet.org या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -