घरताज्या घडामोडीसोमवारपासून दूध महागणार!

सोमवारपासून दूध महागणार!

Subscribe

महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेच्या पुण्यात पार पडलेल्या बैठकीत दूध दरवाढीचा निर्णय घेण्यात आला.

राज्यातील सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी समोर आली आहे. येत्या सोमवारपासून राज्यात दुधाच्या दरात वाढ होणार आहे. लिटरमागे दोन रुपयांनी दूध महाग होणार आहे. त्याबाबतचा निर्णय आज महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेच्या पुण्यात पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला ६० संस्थांचे १५० प्रतिनिधी हजर होते. दूध खरेदी दरात वाढ झाल्याने विक्री दरात वाढ करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. परिणामी कोणत्याही ब्रँडचे दूध घेतल्यास ग्राहकांना दोन रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.

…म्हणून दूध दरवाढीचा निर्णय

दूध अनुदानाची रक्कम कमी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारीमध्ये घेतला. त्यानुसार प्रति लिटरमागे ३ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दूध व्यावसायिकांना लिटरमागे दोन रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता. त्यामुळे शासनाने ३ रुपयांऐवजी ५ रुपये अनुदान द्यावे अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. पण शासनाच्या वतीने कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्राहकांना दूध दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणत्याही ब्रँडचे दूध खरेदी केल्यास त्यांना दोन रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. येत्या सोमवारपासून ही वाढीव दरवाढ लागू होणार आहे.

हेही वाचा – जीएसटीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी २२ सुधारणा; राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -