मुंबई-आग्रा महामार्गावर पशुखाद्याच्या ट्रकमधून लाखोंचा अवैध मद्यसाठा जप्त

नाशिक ग्रामीण पोलिसांची कार्यवाही

Millions of illicit liquor seized from animal feed truck on Mumbai-Agra highway

नाशिक जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार धडक कारवाई सुरू आहे. त्याप्रमाणे गुरुवारी रात्री ९.०० वा. च्या सुमारास ग्रामीण पोलिसांचे भोये आणि खैरनार यांनी मुंबई आग्रा महामार्गावर टेहरे फाटा परिसरात हॉटेल राजधानी समोर एका ट्रकवर छापा टाकला. सदर ट्रकमध्ये पशुखाद्याच्या गोण्यांचे आड लपवून ठेवलेला लाखोंचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. सदर छाप्यात ट्रक चालकास जागेवरच ताब्यात घेण्यात आले आहे. प्राप्त माहिती वरुण सदर मद्यसाठयाचे मालक अतुल मदन नामक मोठी व्यक्ति आहे. अधिक तपास चालू आहे.

जप्त मुद्देमाल – आयबी, सिग्नेचर, १०० पायपर, बिअर असे विदेशी मद्य व देशी दारू असे एकूण ४९७ बॉक्स अवैध मद्यासाठा, मालट्रक, जनावरांचे पशुखाद्य, रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकूण ३८ लाख ६६३ रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई बाबत मालेगाव छावणी पोलीस ठाणे येथे मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येत असून सदरचा अवैध मद्यासाठा कोठून कोठे घेऊन जात होते याबाबत तपास सुरू आहे.