Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र म्हणून देशात दंगली घडतात - अब्दुल सत्तार

म्हणून देशात दंगली घडतात – अब्दुल सत्तार

पुण्यातील कार्यक्रमात मंत्री अब्दुल सत्तार यांचा खळबळजनक खुलासा

Related Story

- Advertisement -

भाजप कुराण आणि गीता या पवित्र ग्रंथाचे वाचन न करता फक्त कपाटात ठेवते. भाजपाने कुराण व गीता हे वाचून घ्यायला हवेत तरच त्यांना त्यातील सार कळेल. हे ग्रंथ न वाचता ते वर्तन करतात त्यामुळे देशात दंगली घडतात, असा खळबळजनक खुलासा मंत्री अब्दुल सत्तार यांनी पुण्यात केला आहे.

पुण्यातील कोंढवा परिसरात जमियत उलमॉँ व प्रसाद बाबार यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या कार्यक्रमात हजेरी लावत मंत्री सत्तार यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. यावेळी, ते म्हणाले, कोरोना काळात मुस्लिम बांधवांवर मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्याय केला असा आरोप विरोधक करत आहेत. या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबाबत विरोधक गैरसमज फैलवत आहेत.

- Advertisement -

दानवे यांना पाडल्याशिवाय मी टोपी काढणार नाही, विधानसभा निवडणुकीत दानवे यांनी धोका दिला आहे तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आहे, असे सत्तार भाजप मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर बोलताना म्हणाले. दरम्यान या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना गीता आणि कुराण हे दोन्ही ग्रंथ देण्यात आले. यावेळी माजी आमदार महादेव बाबर, आमदार चेतन तुपे, रशीद शेख, अंजुम इनामदार उपस्थितीत होते.


महाराष्ट्रात बर्ड फ्लू आलाय, पशुसंवर्धन मंत्री म्हणतात ‘हे’ करा

- Advertisement -