कांदा निर्यातबंदीविरोधात रस्त्यावर उतरणार : राज्यमंत्री खोत यांचा इशारा

कांदा निर्यातबंदीवर माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची टिका; सरकारविरोधात आंदोलनात उतरणार

Sadabhau khot allegates swabhimani shetkari sanghatana
सदाभाऊ खोत

केंद्र सरकारने घेतलेला कांदा निर्यातबंदीचा निर्णय म्हणजे ‘लहरी राजा, वार्‍यावर प्रजा’ असाच असून याविरोधात रयत क्रांती संघटना भाजपविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नाशिकमध्ये सांगितले.

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत हे बुधवारी (दि.16) दोनदिवसीय नाशिक जिल्हा दौर्‍यावर आले आहेत. यावेळी शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, कांदा अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले होते. या घोषणेचे काय झाले, आता निर्यातबंदी कोणत्या निकषांच्या आधारे केली, असा प्रश्नही त्यांनी केला. आता जावडेकरांनी याबाबत घेतलेली भूमिका स्पष्ट करायला हवी. ही बाब संताप आणणारी आहे. अध्यादेश काढून कांदा वगळला असेल, तर त्यात युद्धजन्य व आपत्कालीन परिस्थिती असताना कांद्याच्या बाबतीत निर्बंध आणता येतात. मग आता अशी कोणती अशी परिस्थिती आहे. अन जर असेल तर कांद्याचाच बाबतीत का? असा प्रश्नही त्यांनी केंद्राला उद्देशून केला.

काँग्रेसला आंदोलनाचा अधिकारच नाही

खुला व्यापार, एक देश एक बाजार पेठ, करार शेती या तीन अध्यदेशास काँग्रेसचा विरोध आहे. सरकार हस्तक्षेप करणार नाही. त्याचा लाभ शेतकर्‍यांना मिळावा, असे असताना काँग्रेसने यास विरोध केला आहे. मग महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगावे, या अध्यदेशास पाठिंबा आहे का? असा प्रश्न खोत यांनी उपस्थित केला. नसेल तर त्यांना आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.