‘माझ्या सुरक्षतेपेक्षा देशाची, राज्याची आणि येथील जनतेची सुरक्षा महत्वाची’

Ahmednagar
minister shankarrao gadakh gave up his protection for police force
मंत्री शंकरराव गडाख

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन करण्यात आल्याने बंदोबस्तावरील आणि पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे वाहनांची कमतरता जाणवत आहे. यासाठी काही वाहने अधीग्रहीत केली जात असताना राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांना एक पत्र देत आपला बंदोबस्त आणि त्यांच्यासाठी असलेले पोलीस वाहन संचारबंदीच्या काळात वापण्यास मुभा दिली आहे.

मंत्री गडाख यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात म्हटले की, देश आणि राज्य सध्या करोना व्हायरसचा सामना करत असून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रहितासाठी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. याचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असुन आपल्या भागातील संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा आटोकाट प्रयत्न करत आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर आलेला अधिकचा ताण पाहता मंत्री म्हणून माझ्या सुरक्षेसाठी असलेले पोलिस कर्मचारी आणि ते वापरत असलेले पोलीस वाहन आपण शहर आणि परिसरातील संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी वापरण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे.

आज माझ्या सुरक्षेपेक्षा देशाची तसेच महाराष्ट्राची आणि येथील जनतेची सुरक्षा महत्वाची आहे. महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझे ते कर्तव्य आहे. मी आजपासून माझ्या सुरक्षेसाठी असलेले पोलिस कर्मचारी आणि ते वापरत असलेले पोलीस वाहन करोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेत वापरण्यास परवानगी देत असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.


हेही वाचा – CoronaVirus: ‘अत्यावश्यक वस्तुंची दुकानं दररोज सुरू राहणार’


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here