घरमहाराष्ट्रपुण्यात अडीच वर्षाच्या मुलीची हत्या

पुण्यात अडीच वर्षाच्या मुलीची हत्या

Subscribe

मुंबईत अडीच वर्षाच्या मुलीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुण्यात एका अडीच वर्षाच्या मुलीचे मध्य रात्री अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादाय घटना घडली आहे. ही घटना पिंपरी-चिंचवडच्या सांगवी भागात घडली आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी औंध रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यू मागचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

सोमवारी रात्री अडीच वाजता पिंपळे सौदागर येथील लेबर कँपच्या वस्तीतून एक अडीच वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. मुलीच्या आईला कळताच तिने कुटुंबियांना सांगितले. मुलीच्या आई-वडिलांनी दोन तास मुलीचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. अखेर त्यांनी सांगवी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर मिलिट्री कॅम्पच्या कंपाऊडमध्ये पाण्याच्या खड्यात या मुलीचा मृतदेह आढळला. तिच्या मृत्यू मागील कारण अध्याप कळलेला नाही. सांगवी पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – पुण्यात मोबाइल गेमच्या आहारी गेलेल्या तरुणाची आत्महत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -