Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम धक्कादायक! अत्याचार करणाऱ्या संशयिताची गळफास घेत आत्महत्या

धक्कादायक! अत्याचार करणाऱ्या संशयिताची गळफास घेत आत्महत्या

मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयिताने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

Related Story

- Advertisement -

बलात्कार करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात अशीच एक धक्कादायक घटना घडली होती. गोंदियावरुन पुण्याला जाणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच कोल्हापुरात एका अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयितानेही गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील सावर्डे दुमाला येथे हिरवडे गावात हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. संशयित आरोपी नेताजी खाडे यांनी रविवारी एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीला खाऊचे आमिष दाखवून मध्यवस्तीतील एका ठिकाणी बोलावून घेतले. त्यानंतर त्या मुलीवर संशयित आरोपींनी बलात्कार केला. मुलीने आरडाओरड करताच संशयित आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला. या घटनेबाबत पीडितीच्या कुटुंबाला कळताच त्यांनी संशयित आरोपी नेताजी खाडे याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे कळताच खाडे पसार झाला होता. पोलिसांसह त्याच्या नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. मात्र, त्याचा पत्ता लागला नाही. अखेर मंगळवारी खाडे याचा त्याच्या शेतात गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

- Advertisement -

संशयित आरोपी नेताजी खाडे याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहीली होती. यामध्ये ‘आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरु नये’,असा उल्लेख करण्यात आला आहे.


हेही वाचा – महाराष्ट्र हादरला, चालत्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार


- Advertisement -