Mitron App तात्काळ करा डिलीट, महाराष्ट्र सायबर सेलचे आवाहन

Mumbai
mitron users delete app immediately says maharashtra cyber cell
Mitron App तात्काळ करा डिलीट, महाराष्ट्र सायबर सेलचे आवाहन

टिकटॉक नंतर Mitron अॅपचे क्रेझ सुरू आहे. पण काही काळानंतर Mitron गुगल प्ले स्टोअरवरूनही हटवण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्र सायबर सेलने Mitron अॅप युजर्सना एक अधिकसूचना जारी केली आहे. यात म्हटले आहे की, या अॅपमध्ये सुरक्षेबाबत खूप कमरता असल्यामुळे तुम्हाला नुकसान पोहोचू शकते. तसेच यामुळे हॅकर्स देखील अकाऊंट हॅक करून गैरफायदा घेऊ शकतात आणि तुम्हाला धमकी सुद्धा दिली जाऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्र सायबर सेलने Mitron अॅप युझर्सना इशारा दिला आहे. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे.

Mitron अॅप ज्यांनी कुणी डाऊनलोड केला असेल त्यांनी तात्काळ डिलीट करा, असे आवाहन देखील महाराष्ट्र सायबर सेलकडून करण्यात आले आहे. माहितीनुसार, कोणत्याही अकाऊंटवरून Mitron अॅप लॉगिन केल्यानंतर फक्त युजर आयडीची माहिती दिली पाहिजे. यासाठी पासवर्डची गरज पडत नाही. यामध्ये लॉगिन विथ गूगलचे फिचर देण्यात आले आहे. त्यामुळेच हे अॅप गूगल अकाऊंटची खासगी माहिती मिळवते. तसेच यामध्ये लॉगिनसाठी सिक्योर सॉकेट लेयल प्रोटोकॉलचा वापर केला गेला नाही आहे. याचा फायदा हॅकर्स घेऊ शकतात आणि तुमचे अकाऊंट हॅक होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्र सेलेने तात्काळ अॅफ डिलीट करण्याचे आवाहन केले आहे.

Mitron अॅप हे पाकिस्तांनी Tic Tic चे रिपॅकेज्ड व्हर्जन आहे. तसेच या अॅपची नेमकी माहिती कुणाकडे आहे याबाबत अद्याप स्पष्ट झालेल नाही आहे. शिवाय कोणतीही प्रायव्हसी पॉलिसी देखील या अॅपची नाही आहे.