भाजप सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे कोरोना पॉझिटिव्ह

मुंबईतील पावसाळी अधिवेशनानंतर आमदार प्रा. फरांदे यांनी जळगाव दौरा आटोपून नाशिकला परतताच केली चाचणी

Devyani_Farande

भारतीय जनता पक्षाच्या सरचिटणीस तथा नाशिकच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांचा कोरोना रिपोर्ट रविवारी (दि. १३) पॉझिटिव्ह आला. मुंबईतील पावसाळी अधिवेशनानंतर आमदार प्रा. फरांदे यांनी जळगाव दौरा आटोपून नाशिकला परतल्या होत्या.

गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनपासूनच प्रा. फरांदे आरोग्य शिबिर, उपक्रमांद्वारे लोकांच्या संपर्कात आहेत. त्यांनी यापूर्वी चार ते पाच वेळा कोरोनाची चाचणीही केली होती. या सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या.

मुंबई अधिवेशन आणि जळगाव येथे प्रवास केल्यामुळे  सावधगिरी म्हणून कोरोनाची पुन्हा कोरोनाची चाचणी केली. ती पाॅझिटीव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, ही विनंती.
– आ. देवयानी फरांदे