तो तु बॉक्सर क्यू बना भाई ? महाराष्ट्रातील आमदाराचा विजेंदर सिंहला सवाल

Mumbai
ram satpute vs vijender singh

भारतीय बॉक्सर विजेंदर सिंहच्या एका ट्विटमुळे आता एक नव्या वादाला ठिणगी पडली आहे. जगभरात करोनाचे सावट वाढत असतानाच विजेंदर सिंह याने एक ट्विट करत एका विषयाला वाचा फोडली आहे. पण त्याच्या ट्विटमुळे विंजेदरला राजकारणी मंडळींनीही टार्गेट करण्यासाठी सुरूवात केली आहे. महाराष्ट्रातील भाजपचे आमदार राम सातपुते विजेंदर सिंहला प्रश्न करत थेट विचारल आहे की, तो तु बॉक्सर क्यू बना ?

भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी पुतळ्याच्या मुद्द्यावर विजेंदरने केलेल्या ट्विटबद्दल टार्गेट केले आहे. वैसे तो आज के जमाने मे बॉक्सर की नही डॉक्टर की जरूरत है.. तो तू बॉक्सर क्यू बना भाई ? अस ट्विट राम सातपुते यांनी केले आहे. विजेंदरने आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, अब कोई ईन बावलीबूचा से पूछे स्टैचून ज्यादा जरूरी है या अस्पताल या स्कूल. याच ट्विटचा समाचार घेत राम सातपुते यांनी ट्विट केले आहे. राम सातपुते आणि विजेंदर सिंह समर्थकांमध्ये ट्विट युद्ध रंगल्याचे या निमित्ताने पहायला मिळत आहे.

कोण काय म्हणाल…