कर्डिलेंच्या जावयाला राष्ट्रवादीची उमेदवारी

नगरमध्ये भाजपच्या सुजय विखेंंना देणार आव्हान

Nashik
Sangram Jagtap
संग्राम जगताप

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने आमदार संग्राम जगताप यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे नगरमध्ये भाजपच्या सुजय विखेंना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीचे संग्राम जगताप असा सामना रंगणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण अहमदनगर मतदार संघातून सुजय विखे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे नाराज सुजय विखे पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाकडून सुजय विखे पाटील लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता सुजय विखे पाटील यांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार संग्राम जगताप यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. जगताप हे भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे ते जावई आहेत. कर्डिले संग्राम जगताप यांना मदत करतील असा राष्ट्रवादीचा अंदाज आहे. जगताप यांनी दोन वेळा नगरचे महापौर पद भुषवले आहे. शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी त्यांना अटकही झाली होती. काही काळ ते या प्रकरणामुळे कोठडीत होते. राज्यात हे प्रकरण प्रचंड गाजले होते. अंदाजपत्रकाच्या प्रती जाळल्याने त्यांचे निलंबनही झाले होते. नगर महापालिका निवडणुकीत जगताप यांनी पक्षाचे आदेश डावलुन भाजपला मदत केली होती त्याच जगताप यांना भाजप विरोधात राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here