घरCORONA UPDATECoronaVirus - 'चाकरमान्यांनो गावाक या', आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र!

CoronaVirus – ‘चाकरमान्यांनो गावाक या’, आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र!

Subscribe

राज्यासह देशात सध्या करोनामुळे हाहाकार उडालेला असताना मुंबईत राहणारे अनेक चाकरमानी आपल्या गावी जाण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र लॉक डाऊनमुळे चाकरमान्यांना गावी काय स्वतःच्या घरातूनही बाहेर पडता येत नाही. एकतर मुंबईत दहा बाय दहाची खोली त्यात घरात बसून रहायचे कसे असा सवाल मुंबईकर उपस्थित करत आहेत. मात्र मुंबईतल्या चाकरमान्यांसाठी राष्ट्रवादीचे रत्नागिरीतील आमदार शेखर निकम धावून आले आहेत. दहा बाय दहाच्या खोलीत शौचालयाचीही अडचण होते. त्यामुळे चाकरमान्यांना मुंबईतून कोकणात परतू द्या, असं पत्र निकम यांनी सरकारला लिहिलं आहे.

काय म्हणालेत शेखर निकम – 

चाळ संस्कृतीत दहा बाय दहाच्या खोलीत चाकरमान्याला राहणे अशक्य आहे. अनेक ठिकाणी शौचालयसुद्धा सार्वजनिक आहेत. त्यामुळे अनेक चाकरमान्यांचे इथून सुटकेसाठी फोन येत आहेत. नोकरीनिमित्त मुंबईत गेलेल्या चाकरमान्यांना कुटुंबासह कोकणात येण्याची परवानगी द्यावी, असे पत्र आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिले आहे.

- Advertisement -

मुंबईसह विरार, नालासोपारा भागात मोठ्या प्रमाणात कोकणातील चाकरमानी राहतात. मुंबईत उष्णता वाढत चालल्यामुळे एका खोलीत चार ते पाच जणांना राहणे अवघड झाले आहे. लहान मुलं खूप रडतात, चाकरमान्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे, असं त्यांनी लिहिलं आहे. कोकणातील वाडी संस्कृती सक्षम असल्याने एकदा निर्णय झाला, की कोणी विनाकारण घराबाहेर पडणारही नाही आणि एकत्र जमणारही नाही. चाकरमान्यांना घरी जाण्यासाठी दोन दिवसांची परवानगी द्यावी. प्रत्येक तालुक्यातील चेकनाक्यावर तपासणी करुन घरी जाण्याची परवानगी दिली, तर अनेक कुटुंब सुखरुप घरी जाऊन आपापली काळजी घेतील, अशी ग्वाही शेखर निकम यांनी पत्रातून दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -