घरमहाराष्ट्रएमएमआरडीएकडून रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा

एमएमआरडीएकडून रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा

Subscribe

एमएमआरडीएकडून रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा होत असल्याचे समोर आले आहे. उल्हासनगर - ४ येथील सुभाष टेकडी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते भरत नगर या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरु आहे.

उल्हासनगर येथील सुभाष टेकडी परिसरात सुरु असलेल्या रस्त्याच्या कामात मोठया प्रमाणात हलगर्जीपणा होत आहे. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. एमएमआरडीए प्रशासनाने हे काम कंत्राटदाराला दिले आहे. मात्र एमएमआरडीए प्रशासन आणि कंत्राटदार नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत आहेत. उल्हासनगर – ४ येथील सुभाष टेकडी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते भरत नगर या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरु आहे. एमएमआरडीए प्रशासनाने हे काम एमआर या खाजगी कंपनीला दिले आहे.

रस्त्याच्या कडेला आणि मध्यभागी ३ ते ४ फुटांचे खड्डे

रस्त्याचे खोदकाम करीत असतांना वाहनचालक अथवा पादचाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या धोक्याच्या सूचना किंवा खूण दर्शविण्यात आलेल्या नाहीत. रस्त्याच्या कडेला आणि मध्यभागी जवळजवळ ३ ते ४ फुटांचे खड्डे आहेत. त्याठिकाणी बॅरिकेट्स अथवा जाळ्या लावणे आवश्यक असतांना कोणत्याही प्रकारचे सुरक्षिततेच्या उपाययोजना केलेल्या नाहीत. अनेकवेळा कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे जलवाहिन्या फुटल्या आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी करून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या धोकादायक रस्त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना नेहमी जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.

या रस्त्याच्या कामात मोठा हलगर्जीपणा करण्यात येत आहे. अनेक छोटे-मोठे अपघात नेहमीच होत असतात. या परिसरात तक्षशीला, गुरुकुल, नालंदा, लोखंडे आणि अन्य शाळा आहेत. शिवाय अंबरनाथ शहराला जोडणारा हा महत्वाचा रस्ता आहे. त्यामुळे शेकडो विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिक या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. मी स्वतः एमएमआरडीए प्रशासन आणि कंत्राटदाराकडे मौखिक तक्रारी केल्या आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
– कविता बागुल, स्थानिक नगरसेविका
- Advertisement -

हेही वाचा – उल्हासनगरच्या धुरू बार मध्ये चाकू हल्ल्यात एकजण जखमी

मी अनेकदा या रस्त्याची पाहणी केली आहे. रस्त्याचे काम चांगल्याप्रकारे सुरु आहे. मात्र याबाबत तक्रारी असल्यास मी कंत्राटदाराला यासंदर्भात जाब विचारेल
– सिद्धेश्वरी टेम्भूर्णीकर, एमएमआरडीएच्या कनिष्ठ अभियंता

रस्त्याचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. आमच्याकडे तक्रारी आल्यानंतर आम्ही लगेच दखल घेतो.
– दिपक शर्मा, एमआर कंपनीचे सुपरवायजर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -