घरताज्या घडामोडीडॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची 'इतकी' वाढणार

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची ‘इतकी’ वाढणार

Subscribe

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची वाढवण्यासाठीचा प्रशासकीय निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नुकत्याच झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत घेतला आहे. याआधीच उंची वाढवण्यासाठीचा कॅबिनेट निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता. पण या प्रस्तावावर प्रशासकीय निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यासोबतच आणखी १५ निर्णय एमएमआरडीएने घेतले आहेत. एमएमआरडीए प्राधिकरणाची बैठक फेब्रुवारीमध्येच होणे अपेक्षित होते, पण कोव्हिडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती. अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची 149 वी बैठक मंगळवारी पार पडली.

नगर विकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत ही बैठक पार पडली. या बैठकीसाठी एमएमआरडीए आयुक्त आर ए राजीव यांची उपस्थिती होती. आजच्या बैठकीत एकुण १६ निर्णय घेण्यात आले. आजच्या बैठकीचे प्रास्ताविक व सादरीकरण राजीव यांनी केले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदुमिल येथील पुतळ्याच्या उंचीत वाढ करण्याचा प्रस्ताव मंजुरी देण्याचा प्रशासकीय निर्णय घेण्यात आला. याआधी पुतळ्याची उंची २५० फुटांवरून ३५० फुट करण्याचा निर्णय राज्याच्या कॅबिनेटमध्ये घेण्यात आला होता. तर पायथ्याची उंची ही १०० फुट राहणार आहे. एकुण पुतळ्याची उंची आता ४५० फुट इतकी होणार आहे. तसेच खाजगी विकासकांमार्फत मेट्रो स्थानकात बांधकाम व विकास कामांना जोडणी मार्गास थेट मंजुरीचा निर्णय घेण्यात आला. मुंबईतील फ्लायओव्हरच्या धोरणासाठी कामांनाही आज मंजुरी देण्यात आली.

- Advertisement -

मेट्रो मार्गासाठी २ अ तसेच ७ क्रमांकाच्या मार्गावर मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट हब उभारण्यासाठी मंजुरीही देण्यात आली आहे. तसेच मुंबईत इंटिग्रेटेड टिकिटींग सिस्टिमसाठी मंजुरी देण्यात आली. मुंबई महानगर क्षेत्रात अग्निशमन सेवा देण्यासाठी आज मंजुरी देण्यात आली. वांद्रे कुर्ला संकुलातील ई ब्लॉक मधील इमारतीच्या पुर्नविकासासाठी तत्वत: मान्यता देण्यात आली. सिटी पार्क, बीकेसी ते महाराष्ट्र निसर्ग उद्यान येथे पादचारी पुलाच्या निर्मितीसाठ आआज मंजुरी देण्यात आली. तसेच चार निर्णय हे भूखंड खरेदी, भूखंड वाटप, अतिरिक्त रक्कम अदा करणे यासारख्या विषयांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -