घरताज्या घडामोडी#राज_साहेब_मी_तुमचा_तान्हाजी - मनसे कार्यकर्त्यांचा नवा 'हॅशटॅग'

#राज_साहेब_मी_तुमचा_तान्हाजी – मनसे कार्यकर्त्यांचा नवा ‘हॅशटॅग’

Subscribe

सध्या बॉक्स ऑफिसवर अजय देवगणच्या तान्हाजी सिनेमाने धुमाकूळ घातला असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील #राजसाहेब_मी_तुमचा_तान्हाजी असा नवा ‘हॅशटॅग’ सुरू केला आहे. त्यामुळ मनसेच्या या नव्या हॅशटॅगची जोरदार चर्चा सुरू आहे. २३ जानेवारीला मनसेचे महाअधिवेशन मुंबईमध्ये पार पडणार आहे. या अधिवेशना दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवी भूमिका घेण्याची चर्चा सुरू असतानाच आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी देखील निर्धार केल्याचे पहायला मिळत आहे.

म्हणून मनसेच्या कार्यकर्तांचा निर्धार

गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसेला यश मिळत नसल्याने मनसेचे काय होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना आता यापुढील निवडणुका जिंकण्याचा निर्धार मनसेचे कार्यकर्ते करताना दिसत आहे. जसे औरंगजेबाच्या ताब्यातील कोंढाणा पुन्हा जिंकण्यासाठी स्वराज्याचे-शिवरायांचे शिलेदार तान्हाजींनी स्वत;च्या जीवाची बाजी लावली तसे आपण आपला पक्ष वाढवू असे आवाहन सोशल मिडीयाच्या माध्यमातून मनसेचे कार्यकर्ते करताना पहायला मिळत आहे. तसेच भविष्यात होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये मनसेचा प्रत्येक मनसैनिक तान्हाजी प्रमाणे लढून मनसेचा गड अबाधित ठेवेल असा निर्धार सर्व मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -