घरमहाराष्ट्रपंतप्रधान पत्रकारांच्या प्रश्नांना घाबरतात - राज ठाकरे

पंतप्रधान पत्रकारांच्या प्रश्नांना घाबरतात – राज ठाकरे

Subscribe

‘लाव रे तो व्हिडिओ’, म्हणत लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी-शहा यांच्यावर टीका करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता पुन्हा एकदा मोदींवर टीका केली आहे. यावेळी निमित्त होते शुक्रवारी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचे. खरंतर या पत्रकार परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते. मात्र त्यांनी मौन बाळगल्याचे पहायला मिळाले. यावरून आता मोदींवर टीका होत असताना राज यांनी देखील जोरदार टीका केली आहे.

ज्या पत्रकार परिषदेत मोदी बोलले नाहीत त्या पत्रकार परिषदेबद्दल न बोललेलं बर. पत्रकारांना सामोरे जायला आपला पंतप्रधान घाबरतो हे दुर्दैव आहे. अमित शहा यांनाच बोलायचे होते तर हे आले तरी कशाला? पाच वर्षानंतरही यांना पत्रकरांशी बोलावसं वाटत नाही. ही त्यांची मानसिक हार आहे. यांच्यामध्ये लोकांचे बोलणं ऐकण्याची आणि उत्तर देण्याची हिंमत नाही. पंतप्रधान का घाबरतात याचे उत्तर त्यांनी द्यावे. अमित शहा यांना कळेल दादागिरी काय असते ते? पश्चिम बंगालने सुरुवात केली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले राज ठाकरे

पंतप्रधानांची पत्रकार परिषद… मौन की बात”, असे राज ठाकरे यांनी या ट्विटमध्ये म्हणत मोदींवर टीका केली आहे. या अगोदरही राज ठाकरे यांनी मोदींवर ट्विटर द्वारे अनेकदा टीका केली आहे.

- Advertisement -

म्हणून राज यांची मोदींवर टीका

अमित शाह यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते. मात्र त्यांनी पत्रकारांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. तसेच ‘ही पत्रकार परिषद पक्षाध्यक्षांची असल्याने पक्ष शिस्तीनुसार मी उत्तरे देणे योग्य नाही’, असे मोदींनी सांगितले. त्यामुळे आता त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे.


 

हे वाचाच – पत्रकारांच्या प्रश्नांना मोदींची बगल; वृत्तपत्राने कोरी बातमी छापली
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -