घरमहाराष्ट्रआणि राज ठाकरे ढाब्यावरच थांबले जेवायला!

आणि राज ठाकरे ढाब्यावरच थांबले जेवायला!

Subscribe

राज ठाकरेंनी विदर्भ दौऱ्यावर वाशिमहून अकोल्याला जाताना मध्ये चक्क एका ढाब्यावर पेटपूजा केली. दुपारी १.३० च्या सुमारास वाशिम येथील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक संपल्यानंतर राज ठाकरे अकोल्यासाठी रवाना झाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यात असून, राज ठाकरेंच्या या दौऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पण राज ठाकरे या दौऱ्यात साध्या राहणीमानात वावरताना दिसत आहेत. मग तो ट्रेनचा प्रवास असो वा कार्यकर्त्यांच्या घरी जमिनीवर बसून जेवण करणं असो. या दौऱ्याच्या निमित्ताने का होईना, ते सर्वसामान्यांचे जीवन जगताना पाहायला मिळत आहे. मंगळवारी तर त्यांनी चक्क ढाब्यावर जेवण करणं पसंत केलं.


म्हणून राज ठाकरे बदलत आहेत? – क्लिक करा आणि कारण वाचा!

- Advertisement -

दुपारी वाशिमहून अकोल्याला जाताना मध्ये चक्क एका ढाब्यावर त्यांनी पेटपूजा केली. दुपारी १.३० च्या सुमारास वाशिम येथील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक संपल्यानंतर राज ठाकरे अकोल्यासाठी रवाना झाले. वाटेत पावणे तीनच्या सुमारास मालेगावनजीकच्या नागरतास बायपास रोडवरील ढाब्यासमोर राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या गाड्या थांबल्या. दुपारचे जेवण केल्यानंतर सर्वजण अकोला पदाधिकारी बैठकीसाठी रवाना झाले.


वाचा कधी आणि कुठे जाणार राज ठाकरे – ‘असा’ आहे राज ठाकरेंचा विदर्भ दौरा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -