Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र राज्यातील व्यापाऱ्यांना वर्षभर कर माफी द्या , मनसेची मागणी

राज्यातील व्यापाऱ्यांना वर्षभर कर माफी द्या , मनसेची मागणी

पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली मागणी

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनामुळे अनेक व्यवसाय बंद झाले तर अनेक व्यापारांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला अशाच आता मनसेने गेल्या वर्षभरापासून आर्थिक फटका सहन करणाऱ्या व्यापाऱ्यांचा कर माफ द्या अशी मागणी केली आहे.  मुंबईतील सर्व लहान- मोठे दुकानदार, व्यापारी यांना आकारण्यात येणारे विविध शुल्क, कर आदी वर्षभरासाठी माफ करण्यात यावेत, अशी मागणी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे.

मुंबईत कोरोना व लॉकडाऊनमुळे व्यापारी, दुकानदार, फेरीवाले आदी सर्वांवरच मोठे आर्थिक संकट कोसळले. आता कोरोना नियंत्रणात आल्याने सरकारने लॉकडाऊनमध्ये जरी शिथिलता आणली असली तरी त्यांचे आर्थिक नुकसान भरून निघणारे नाही. यास्तव, सर्व दुकानदार, व्यापारी यांना आकारण्यात येणारे विविध शुल्क, कर आदी वर्षभरासाठी माफ करण्यात यावेत, अशी मागणी मनसेच्या व्यापारी सेलचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. शहर व उपनगरातील छोट्या व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या आणि अडचणी यांची वेळीच दखल घेऊन मनसेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी पालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्या समोर व्यापारी वर्गाच्या समस्या मांडल्याया असून आयुक्तांनी त्यावर सकारात्मकता दर्शवली आहे.

- Advertisement -