घरमहाराष्ट्रदुर्गम आणि पूरग्रस्त भागात पोहोचली मनसे

दुर्गम आणि पूरग्रस्त भागात पोहोचली मनसे

Subscribe

राज्यात आलेल्या पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ कोल्हापूर, सांगली भागात सुरू आहे. अशा वेळी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यापर्यंतच्या लोकांना मदत मिळावी यासाठी राजकीय पक्षदेखील प्रयत्नशील आहेत. मनसेनेही पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला असून कोणीही न पोचलेल्या अशा सांगली जिल्ह्यातील शिये गाव, नागदेववाडी, माळवाडी, आंबेवाडी, चिखली, जयसिंगपूर येथील शिरोळ, नृहसिंगवाडी येथील गावात मनसेने मदत पोहोचवली आहे. तेथील ग्रामस्थांची चौकशी करत मनसेतर्फे सहाय्य करण्यात आले असून सांगली येथील औषधाच्या मागणीप्रमाणे त्यांना पुरवठा करण्यात आला आहे.

साधारण ५००० लीटर पाणी, ५००० फेस मास्क, ३५०० ORS रेडीमिक्स ड्रिंक, ५००० सेनेटरी नॅपकिन्स, ५०० बेबी डायपर पॅंन्टस, बॅबी फूड(मिल्क पावडर,सेरेलॅक इत्यादी), ५००० हजार व्यक्तिंना उपयोगी पडतील इतके अॅंन्टीबायोटिक औषधे, ओआरएस आणि बालरूग्णांसाठी पॅरासिटेमॉल सिरप, पोटभर मिळेल त्यावर काही दिवस पुरेल इतकी रसद आणि इतर जीवनावश्यक वस्तू या ग्रामस्थांना मनसेकडून पुरवण्यात आल्या आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विविध सामाजिक संस्था-संघटना पुढे सरसावल्या असताना आता मुंबईच्या डबेवाल्यांनी ‘नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स’ चॅरिटी ट्रस्ट व ‘मॅक्सविंग्स मिडिया’च्या माध्यमातून मुंबई रेल्वे स्थानकांवर तसेच स्थानकालगतच्या परिसरात जनतेस मदतीसाठी आवाहन केले. आपल्या रोजच्या सेवेतून वेळ काढून मुंबईच्या डबेवाल्यांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी चर्चगेट, लोअर परेल, दादर, वांद्रे, अंधेरी या रेल्वे स्थानकांवर तसेच आजूबाजूच्या परिसरात जनतेकडून निधी गोळा करण्यासाठी उपक्रम राबविला.

हेही वाचा –

अफगाणिस्तानमध्ये ५.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के

- Advertisement -

केरळ, कर्नाटकात पावसाचे थैमान; १६६ जणांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -