घरमहाराष्ट्र'पुनःश्च हरी ॐ म्हणता आणि हरीलाच कोंडून ठेवता', मनसेचा सरकारला सवाल

‘पुनःश्च हरी ॐ म्हणता आणि हरीलाच कोंडून ठेवता’, मनसेचा सरकारला सवाल

Subscribe

देशासहीत राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र हळुहळु जनजीवन पुर्वपदावर येत असून अनेक गोष्टी टप्प्याटप्प्याने खुल्या करण्यात आल्या आहेत. ठाकरे सरकारने हॉटेल, बार, उद्याने, जिम, नाट्यगृहे, थिएटर यांनाही व्यवहार सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मात्र अद्याप मंदिरे खुले करण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे भाजप आणि मनसेने सरकारवर टीका केली आहे. मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी ट्विटरद्वारे सरकारवर निशाणा साधला आहे. “पुनःश्च हरी ॐ म्हणता आणि हरीलाच कोंडून ठेवता”, असा प्रश्न नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

नांदगावकर पुढे म्हणाले की, “बार उघडले, मग बारची वेळ देखील वाढवून दिली. आता जलतरण तलाव, मल्टिप्लेक्सला परवानगी, मग कोरोना फक्त मंदिरातच होईल का? काय तर्क असावा. यामागे कोडेच आहे. हा केवळ भावनेचा नाही तर तेथील संबंधित हजारो व्यावसायिकांच्या उपजीविकेचा आणि रोजगाराचा देखील प्रश्न आहे.”

भाजपनेही हाच मुद्दा सातत्याने लावून धरला आहे. दोन दिवसांपूर्वीच भाजपच्या अध्यात्मिक आघाडीतर्फे तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिर खुले करण्यासाठी आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करुन आंदोलन केल्यामुळे भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -