घरताज्या घडामोडीतू येच ग शुर्पणखा, कोणच्या तोंडाला काळे फासले जाते ते बघ; मनसेचा...

तू येच ग शुर्पणखा, कोणच्या तोंडाला काळे फासले जाते ते बघ; मनसेचा तृप्ती देसाईंना इशारा

Subscribe

महिला व संततीबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्याविरोधात दोन-तीन दिवसात गुन्हा दाखल न झाल्यास इंदोरीकरांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी मंगळवारी नगरमध्ये दिला. तर त्यांना वाचविणाऱ्या मंत्री आणि राजकारण्यांनादेखील अद्दल घडविण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याचं पार्श्वभूमीवर मनसेच्या पुणे महिला शहराध्यक्ष रुपाली ठोंबरे पाटील यांनी तुप्ती देसाई यांना इशारा दिला आहे. ‘आता हे खूप अति होतंय. तू येच ग शुर्पणखा, कोणच्या तोंडाला काळे फासले जाते ते बघ तुझ्या उघड्या डोळ्यांनी’, असं म्हणतं रुपाली ठोंबरे पाटीला यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.

तृप्ती देसाईंवर निशाणा साधत त्या म्हणाल्या की, ‘अनेकदा इंदोरीकर महाराजांनी समाजातील वाईट प्रवृत्तीविषयी प्रबोधन केलं. अनेकांचे संसार त्यांनी बसवले आहेत हे सगळ्या महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर आहे. पण आज काही शूर्पणखा महिलेने दोन-तीन दिवसात गुन्हा दाखल न झाल्यास इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासण्याचा इशार दिला आहे. हे अत्यंत निंदणीय आहे तसंच स्त्री असण्याचा गैरफायदा घेतला जात आहे.’

- Advertisement -

आता भाजपाच्या पाठोपाठ मनसे देखील इंदोरीकर महाराजांचे समर्थन करत आहे. या शुर्पणखा महिलेला आव्हान आहे, तु काळं फासण्याचा प्रयत्न कर मग तुझं नाक कसं कापायचा हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे. स्त्री असल्यामुळे कोणतीही गोष्ट सहन करणार नाही. तसंच तिच्यामुळे संपूर्ण स्त्री वर्ग बदनाम होत आहे असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

आता हे खूप अति होतंय तू येच ग श्रुपनखा ,कोणच्या तोंडाला काळे फासले जाते ते बघ तुझ्या उघड्या…

Rupali Patil Thombare ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 18, 2020

- Advertisement -

हेही वाचा – …तर इंदुरीकरांच्या तोंडाला काळे फासणार – तृप्ती देसाई


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -