‘तेजस’मधल्या गुजराती वेशभूषेवर मनसेचा आक्षेप!

तेजस या खासगी ट्रेनचा दुसरा टप्पा मुंबई-अहमदाबाद येत्या १९ तारखेपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू होत आहे. मात्र, या ट्रेनमधल्या रेल होस्टेसला गुजराती पद्धतीचा युनिफॉर्म दिल्यामुळे मनसेने त्यावर आक्षेप नोंदवला आहे.

Mumbai
mns opposes tejas gujrati uniform

मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद अशी धावणारी देशातील दुसरी प्रायव्हेट ट्रेन ‘तेजस एक्सप्रेस’ आजपासून सुरू होत आहे. मात्र, ही सुरू होताच अनेक वादात सापडली आहे. या ट्रेनमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या ‘रेल होस्टेस’ची वेशभूषा गुजराती संस्कृतीची घेण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर या गाडीचं नाव सुद्धा मराठीत लिहिलं गेलेलं नाही. यासबंधी ‘दैनिक आपलं महानगर’ने दिलेल्या बातमीची दखल महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाकडून घेण्यात आली आहे. ‘मुंबई अहमदाबाद खासगी तेजस चालवायची असेल तर गुजराती संस्कृतीबरोबरच महाराष्ट्राची संस्कृती देखील जपली गेली पाहिजे. अन्यथा आम्ही मुंबईत गाडी येऊ देणार नाही’, असा इशारा मनसेचे नेते मिलिंद पांचाळ यांनी दिला आहे.


हेही वाचा – राज ठाकरे ‘महाराष्ट्र धर्मसम्राट’; मनसेची पोस्टर्सबाजी


१९ नोव्हेंबरपासून ‘तेजस’ प्रवाशांच्या सेवेत!

‘तेजस एक्सप्रेसच्या नावाच्या पाटीवर एकीकडे केवळ हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषेला स्थान देण्यात येऊन मराठी भाषेला स्थानच न दिल्याने खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे या ट्रेनला रेल्वेच्या विविध युनियनतर्फे काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद-मुंबई-अहमदाबाद अशा ‘तेजस’ या प्रायव्हेट ट्रेनचे १७ जानेवारीला उद्घाटन होत आहे. तर प्रवाशांसाठी ती १९ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या ट्रेनच्या नावाच्या पाटीवर केवळ इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषेलाच स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे त्रिभाषा सूत्राचा विसर रेल्वेची खानपान सेवा सांभाळणार्‍या आयआरसीटीसीला झाला असल्याची टीका होत आहे.

अहमदाबाद-मुंबई ही खासगी तेजस महाराष्ट्राला आणि गुजरातला जोडणार आहे. आम्हाचा गुजराती संस्कृतीला विरोध नाही. मात्र या गाडीचे नाव मराठीत नाही, तर रेल होस्टेसची वेशभूषा सुद्धा महाराष्ट्राची नाही. त्यामुळे ही गाडी अहमदाबाद ते मुंबई चालवण्याचा अधिकर यांना नाही. प्रशासनाने याची दखल घेत, गुजराती भाषा आणि संस्कृती बरोबरच मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती जपावी, अन्यथा आम्ही मनसे स्टाईलने आंदोलन करू.

मिलिंद पांचाळ, मनसे नेता


वाचा सविस्तर – तेजसच्या मुंबई मार्गासाठी मॉडर्न नाही, तर पारंपरिक वेशभूषा!