जळगावमधील मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याची हत्या

जळगावमधील मनसेच्या एका माजी पदाधिकाऱ्याची अज्ञात मारेकऱ्यांनी दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

Jalgaon
A fierce debate has led to a fierce attack on a friend in bandra
मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याची हत्या

जळगावमधील मनसेच्या एका माजी पदाधिकाऱ्याची अज्ञात मारेकऱ्यांनी दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी सकाळी ७ वाजता ही घटना घडल्याचे समोर आले आहे. श्याम दीक्षित असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण जळगाव शहरातील कासमवाडी परिसरातील पंचमुखी हनुमान मंदिर येथे राहणारा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

नेमके काय घडले?

कासमवाडी परिसरातील पंचमुखी हनुमान मंदिर येथे राहणाऱ्या श्याम दीक्षित यांचा साईबाबाब मंदिराच्या प्रांगणात त्यांचा मृतदेह आढळून आला. या ठिकाणी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर औद्योगिक वसाहत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याठिकाणी या घटनेची चौकशी केली. तसेच औद्योगिक वसाहत पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी मारेकऱ्यांच्या शोधासाठी औद्योगिक वसाहत पोलिसांच एक पथक रवाना करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरू असल्याचे सांगत या घटनेबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

मनसेचे माजी शहर उपाध्यक्ष

श्याम दीक्षित हा मनसेचा माजी पदाधिकारी असून त्यांनी मनसेचा शहर उपाध्यक्ष काम पाहिले होते. त्यांच्या हत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनास्थळी पोलिसांना श्यामचा मोबाइल सापडला आहे. परंतु, मोबाइल लॉक असल्याने पोलिसांना अधिक माहिती मिळू शकलेली नाही. श्यामच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन, कॉल डिटेल्स काढण्याचे काम सुरू आहे. त्यावरून काही धागेदोरे मिळू शकतात, याची तपासणी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाली आहे का? याचाही पोलीस तपास करत आहेत.


हेही वाचा – कर नाही तर डर कशाला?