घरमहाराष्ट्रउल्हासनगरमध्ये मनसेने काढला 'टमरेल मोर्चा'

उल्हासनगरमध्ये मनसेने काढला ‘टमरेल मोर्चा’

Subscribe

उल्हासनगरमध्ये महानगरपालिकेच्या विरोधात मनसेने टमरेल मोर्चा काढला. यावेळी मनसेने उल्हासनगर महापालिकेला भेट म्हणून टमरेल दिली.

उल्हासनगर शहरात महापौर पंचम कलानी यांच्या पॅनल क्रमांक २ मधील तेजुमल चक्की या परिसरात शौचालयांची दुरावस्था झालेली आहे. यामुळे झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या गोर-गरीब नागरिकांनाचे अतोनात हाल होत आहेत. महापौर आणि अन्य राजकीय नेतेमंडळींसह मनपा प्रशासनदेखील या समस्येला जबाबदार असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. या राजकीय नेत्यांना आणि प्रशासनाला धडा शिकविण्यासाठी मनसेने सोमवारी महापालिका मुख्यालयावर टमरेल मोर्चा काढला.

मनसेने महापालिकेला भेट म्हणून दिली टमरेल

‘मनपा प्रशासन, महापौर आणि इतर राजकीय नेते स्वच्छ भारत अभियानचे महत्त्व शहराला सांगत आहेत, त्यासाठी अनेक वेळा कार्यक्रम, जाहिराती करून फोटो सेशन केले जाते. यावर लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात येते. परंतु, महापौरांच्या पॅनलमध्येच शौचालयांची बिकट अवस्था झाली आहे, याशिवाय रमाबाई आंबेडकरनगर, पंजाबी कॉलनी, शास्त्रीनगर, सुभाष टेकडी आणि अन्य परिसरातदेखील अशीच अवस्था आहे’, असा आरोप मनसेने केला आहे. दरम्यान, मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख, जिल्हा उपसचिव संजय घुगे, शहर संघटक मेनुद्दीन शेख, सचिन बेंडके, मनोज शेलार, दिनेश आहुजा, बादशाह शेख आणि अन्य कार्यकर्त्यांनी मनपा मुख्यालयावर सोमवारी दुपारी ‘टमरेल मोर्चा’ काढला. यावेळी मनपा आयुक्त आणि महापौर अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीत कार्यालयाला टमरेल भेट देण्यात आले. उपमहापौर जीवन ईदनानी, सभागृह नेता जमनु पुरुस्वानी, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, शहर अभियंता महेश शितलानी यांना टमरेल भेट देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.

शहरभर स्वच्छतेचा संदेश देत फिरणाऱ्या महापौरांना आपल्याच प्रभागातील नागरिकांच्या समस्येचा विसर पडला, अशा आशयाचे पत्र मनसेने २८ जानेवारीला महापालिका प्रशासन आणि महापौरांना दिले होते. मात्र या पत्राची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. आम्हाला आजपर्यंत उडवाउडवीचीच उत्तरे देण्यात येत होती.
– संजय घुगे, मनसे जिल्हा उपसचिव
- Advertisement -

मनसेचा पालिकेला इशारा

जर शहरातील शौचालयांची परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर शहरातील नागरिकांना प्रातर्विधीसाठी मनपा मुख्यालयात पाठविण्यात येईल, असा इशारा मनसेने पालिका प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, या संदर्भात महापौर पंचम कलानी यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, ,शौचालयांच्या दुरुस्तीचे काम करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. यासंबंधीच्या निविदा सुद्धा लवकरच निघणार आहेत. मनसेने या विषयावर राजकारण करू नये, इतकेच माझे म्हणणे आहे.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -