घरमहाराष्ट्रमॉब लिंचिंग भारतात होत नाही

मॉब लिंचिंग भारतात होत नाही

Subscribe

मॉब लिंचिंगसारखे शब्द वापरून हिंदू समाजाला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. विशिष्ट समुदायाप्रती सहानुभूती व्यक्त करताना आपआपसातील संघर्ष वाढवण्यात येत आहे, यापासून सतर्क राहण्याची गरज असल्याचा इशारा देताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मॉब लिंचिंगसारखा प्रकार भारतात होतच नसल्याचे ठामपणे सांगितले. नागपूरमधील रेशीमबागेत आयोजित रा. स्व. संघाच्या विजयादशमी उत्सवात ते बोलत होत

मॉब लिंचिंग शब्द वापरून हिंदूंच्या बदनामीचे षड्यंत्र

- Advertisement -

मोहन भागवत पुढे म्हणाले की, भारतात विविधता असूनही अनेक लोक शांततेत राहतात. लिंचिंग हा शब्दच भारतातला नाही. मॉब लिंचिंग भारतात होत नाही. तरीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव नेहमीच मॉब लिंचिंगच्या काल्पनिक घटनांशी जोडले जाते. अशा घटनांचा संघाशी काहीही संबंध नाही.

येशू ख्रिस्ताच्या काळात एका स्त्रीवर सर्वांनी हल्ला केला, लोक तिला दगड मारू लागले. मात्र ज्याने पाप केले नाही, त्यानेच पहिला दगड मारावा असे येशू ख्रिस्ताने सांगितले. गावात पाण्यावरून झालेले भांडण गौतम बुद्धाने सोडवले असे सांगत लिंचिंग हा शब्द आपल्याकडील नाही, तो बाहेरून आला असे सांगत भारतात लिंचिंग हा प्रकार घडतच नसल्याचे भागवत म्हणाले.

- Advertisement -

देशात काही ठिकाणी अत्याचाराच्या घटना घडतात असे नाही. मात्र त्या एका समुदायाने दुसर्‍या समुदायावर केल्या असे म्हणणे योग्य ठरणार नाही. एखाद्या समुदायातील १०-५ लोकांनी कुणावर अत्याचार केले म्हणून त्या अत्याचाराला संपूर्ण समुदायाला जबाबदार धरणे चुकीचे आहे. कायदा आपले काम करेल, ज्यांना शिक्षा करायची आहे त्यांना ती केली जाईल, असेही भागवत यांनी सांगितले.

अल्पसंख्याकांमध्ये भय निर्माण करण्यात येत असून एकमेकांमध्ये भेद निर्माण करून दुरी निर्माण करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामागे काही विशिष्ट लोक आहेत. याचा प्रतिकार करण्यासाठी, नियंत्रण मिळविण्यासाठी कायदा आहे. पण त्याचा प्रामाणिकपणे आणि सक्तीने अंमल व्हायला हवा, अशी मागणी भागवत यांनी केली.

खासगीकरणाचे समर्थन
भारतातील आर्थिक मंदी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने फार चांगले काम केले आहे. या सरकारने उपाययोजना नक्कीच केल्या आहेत. तेव्हा देशातील आर्थिक मंदीवर सातत्याने चर्चा करणे योग्य ठरणार नाही. अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी थेट विदेशी गुंतवणूक आणि उद्योगांचे खासगीकरण आवश्यक आहे.

भारत हे हिंदू राष्ट्र
भारत हे हिंदू राष्ट्र आहे. या जगात एक सत्य आहे, मात्र त्याला पाहण्याची दृष्टी वेगवेगळी आहे, हे जो मानतो तो हिंदू. धर्माचे पालन करू, धर्म आणि पंथात फरक आहे. मानवता हा धर्म असतो. मात्र पंथ वेगळे आहेत. माझेही खरे आहे; पण माझेच खरे नाही, ही वृत्ती अंगीकारायला हवी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -