घरमहाराष्ट्रआता मध्य रेल्वेवर मिळणार लॉकरचे चार्जिंग स्पॉट!

आता मध्य रेल्वेवर मिळणार लॉकरचे चार्जिंग स्पॉट!

Subscribe

मध्य रेल्वेच्या स्थानकांवर आता लॉकरची सुविधा असणाऱ्या मोबाईल चार्जिंग मशीन बसवण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वे मार्गावर २० अत्याधुनिक डिजिटल मोबाइल कियोस्क चार्जिंग मशीन बसविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोबाईल चार्जिंग मशीन जवळ बसण्याची गरज भासणार नाही. कारण या मशिनला इलेक्ट्रॉनिक लॉकर असणार आहेत. सोबतच मोबाईलला चार्जिंगदेखील जलद गतीने होणार आहे. या सुविधेसाठी प्रवाशांकडून १० रुपये प्रतितास आकारण्यात येणार आहेत. या मशिन खासगी कंपनीकडून चालवण्यात येणार आहेत.

Central railway
प्रातिनिधिक फोटो

भारतात दुसरा प्रकल्प!

यापूर्वी रेल्वे प्रवाशांसाठी मोबाईल चार्जिंग पॉईंटची सुविधा मध्य रेल्वेने दिली होती. ही सुविधा प्रवाशांसाठी नि:शुल्क देखील होती. मात्र ही सुविधा प्रवासी संख्येच्या तुलनेत फारच अपुरी पडत होती. सोबतच चार्जिंग पॉईंटवर सुद्धा सतत तांत्रिक बिघाड होत असल्याने आता मध्य रेल्वेने एका खासगी कंपनीला मोबाईल चार्जिंग व्यवयसाय करण्याची अनुमती दिली आहे. २० अत्याधुनिक डिजिटल मोबाइल कियोस्क मशीन लावण्यात येणार आहेत. यापूर्वी भारतीय रेल्वेतील पहिली डिजिटल मोबाइल कियोस्क मशीन पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद रेल्वे स्थानकावर लावण्यात आली होती. त्यानंतर मध्य रेल्वेची पहिली आणि भारतीय रेल्वेची दुसरी मशिन ही मध्य रेल्वेच्या पुणे विभागात लागणार आहे. प्रत्येक मशीन मध्ये २४ लॉकर असणार आहेत. या २० मशिनपैकी १० पुणे रेल्वे स्थानकावर लावण्यात येणार आहे. उर्वरित मशीन प्रत्येकी २ अशा कोल्हापूर, मिरज, शिवाजीनगर, पिंपरी चिंचव स्थानकात बसवण्यात येणार आहे. या मशिनमुळे मध्य रेल्वेला प्रतिवर्ष २.६ लाख रुपयांच्या महसूल सुद्धा मिळणार आहे.

- Advertisement -

अशी मिळणार सुविधा!

अत्याधुनिक डिजिटल मोबाइल कियोस्क मशीनवर प्रवासी स्वत: चार्जिंग करू शकतात. या मशीनवर १९ इंचाची एलसीडी स्क्रीन असणार आहे. मोबाईल चार्जिंग करेपर्यत तुम्ही रेल्वेच्या मनोरंजक जाहिराती या एलसीडी स्क्रीनवर बघू शकता. मोबाइल फोन चार्जिंग स्टेशनला चार्जिंग बॉक्स लॉकर असणार आहे. त्यामुळे तुमचा फोन सुरक्षित राहणार आहे.

ही मध्य रेल्वेची पहिली आणि भारतीय रेल्वेतील दुसरी मशीन ठरणार आहे. याचा मोठया प्रमाणात प्रवाशांना आणि रेल्वेला फायदा होर्ईल.

शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -