घरताज्या घडामोडीसॅटेलाईटच्या माध्यमातून पिकाच्या वाढीचे निरीक्षण; आयआयटी बॉम्बेच्या प्राध्यापकाचे संशोधन  

सॅटेलाईटच्या माध्यमातून पिकाच्या वाढीचे निरीक्षण; आयआयटी बॉम्बेच्या प्राध्यापकाचे संशोधन  

Subscribe

आता गव्हासारख्या पिकावर नियमितपणे निरीक्षण ठेवता येणार आहे.

देशात रस्त्यावरचा मार्ग शोधण्यापासून ते मिलिटरी एप्लिकेशनचा अतिशय योग्यरीत्या सध्या सॅटेलाईट डेटाचा वापर करून अनेकांना फायदा होत आहे. रिमोट सेन्सिंग सॅटेलाईटचा वापर देखील अतिशय परिणामकारक करण्यात येत आहे. आयआयटी बॉम्बे आणि कृषी तसेच ऍग्री फुड कॅनडाने आता सॅटेलाईटचा वापर करून पिकाची वाढ वेळोवेळी तपासण्यासाठी या सॅटेलाईटचा अतिशय उपयुक्त असा वापर केला आहे. त्यामुळे आता गव्हासारख्या पिकावर नियमितपणे निरीक्षण ठेवता येणार आहे.

भारतासारख्या देशात पिकाची निगराणी करणे हे अन्नसुरक्षा आणि अर्थव्यवस्था या दोन्ही गोष्टींच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. भारतातील सरासरी ६० टक्के जमीनीचा वापर हा शेतीसाठी होतो. अशावेळी सगळ्या शेतीवर नियमितपणे निरीक्षण ठेवणे हे अतिशय जिकीरीचे आणि अशक्य असे काम आहे. त्यामुळे सॅटेलाईटचा वापर हा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. रिमोट सेन्सिंग सॅटेलाईटच्या माध्यमातून रडार स्कॅनरच्या माध्यमातून जमीनीची पृष्ठभाग नियमितपणे स्कॅन करणे शक्य आहे. याचाच वापर हा जमीनीचे मॅपिंग आणि देखरेख करण्यासाठी उपयुक्त आहे. बायोफिजिकल निकषांच्या माध्यमातून एखाद्या भागातील बायोमास तपासणे शक्य आहे.

- Advertisement -

आयआयटी मुंबईच्या संशोधनकांनी केलेल्या संशोधनानुसार तीन बायोफिजिकल निकषांचा वापर अभ्यासासाठी करण्यात आला आहे. कॅनडा आणि मॅनिबोटा येथे गहु आणि सोयाबीन येथे सॅटेलाईटचा वापर करण्यात आला आहे. तीन निकषांमध्ये पिकाच्या पानाचा आकार, बायोमास, रोपाची उंची या तीन निकषांचा वापर करून अभ्यास करण्यात आला. संशोधकांनी या अभ्यासासाठी गणिती मॉडेल विकसित करत सॅटेलाईट डेटा आणि निरीक्षणाच्या नोंदी घेतल्या. या मॉडेलला संशोधकांनी क्लाऊड मॉडेल नाव दिले. पिकातील पाण्याचे प्रमाण या माध्यमातून मोजताना वॉटर क्लाऊडचा वापर करण्यात आला. रडारच्या सिग्नलच्या माध्यमातून अतिशय अचुक डेटा यासाठी गोळा करण्यात आला. मशीन लर्निंग इनपुटच्या माध्यमातून ही माहिती मिळवण्यात या टीमला यश आले. आयआयटी बॉम्बेच्या प्राध्यापक अविक भट्टाचार्य यांच्या नेतृत्वात हा अभ्यास पुर्ण करण्यात आला. जरी हा अभ्यास कॅनडा येथील शेतीसाठी करण्यात आलेला असला तरीही भारतातही शेतीसाठी सॅटेलाईटचा वापर करून अभ्यास करणे शक्य आहे, असे त्यांचे मत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -