अखेर मान्सूनचे गोव्यामध्ये आगमन; गोवाकरांना दिलासा

येत्या पाच दिवसामध्ये गोव्यासह कोकणात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज गोवा हवामान खात्याने वर्तवला आहे.

Goa
monsoon
मान्सून

अखेर मान्सून गोव्यामध्ये दाखल झाला आहे. दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळ, कर्नाटक मार्गे गोव्यात दाखल होणारा मान्सून यावर्षी २ आठवड्यानंतर गोव्यात दाखल झाला. मान्सूनचे आगमन झाल्यामुळे गोवाकरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, येत्या पाच दिवसामध्ये गोव्यासह कोकणात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज गोवा हवामान खात्याने वर्तवला आहे.

मान्सून दरवर्षी गोव्यामध्ये ७ जूनला दाखल होत असतो. मात्र यावर्षी मान्सून दाखल होण्यास उशीर झाल्याने गर्मीमुळे गोवाकर हैराण झाले होते. अखेर आज मान्सूनचे आगमन झाल्यामुळे गोवाकरांना दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर सध्या कमी असला तर येत्या ५ दिवसामध्ये पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यावेळी मान्सून दाखल होण्यास उसीर झाला कारण वायू चक्रीवादळामुळे मान्सून पुढे येण्यास विलंब लागला. आता मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे रखडलेला मान्सून हळूहळू पुढे सरकू लागला आहे.

दरम्यान, २० वर्षात पहिल्यांदाच मान्सून दाखल होण्यास ऐवढा विलंब लागला असल्याची माहिती गोवा वेधशाळेचे संचालक डॉ. पडगलवार यांनी दिली आहे. मान्सून गोव्यात जरी उशिरा दाखल झाला असला तरी उर्वरित दिवसांची भर भरुन काढले अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – 

खूशखबर! अखेर तळकोकणात मान्सूनचे आगमन