घरमहाराष्ट्र'विधानभवन कॅन्टीनमधील उसळ प्रकरणी दोषींना जन्मठेप द्या'

‘विधानभवन कॅन्टीनमधील उसळ प्रकरणी दोषींना जन्मठेप द्या’

Subscribe

राष्ट्रवादीचे नेते आ. अजित पवार यांची सभागृहात मागणी

विधानभवन कॅन्टीनच्या उसळीत चिकनचे तुकडे सापडले होते. अस्वच्छता आणि बेशिस्तीचा हा कारभार तेथीलच अधिकाऱ्याने चव्हाट्यावर आणला होता. आज हे प्रकरण थेट विधानसभेत पोहोचले. विधानभवनाच्या कॅन्टीनमध्ये मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे सापडल्याचा मुद्दा आज अजितदादांनी उपस्थित केला शिवाय संताप व्यक्त करत अशा लोकांना जन्मठेपेची शिक्षा द्यावी अशी मागणी केली.

विधानभवनाच्या कॅन्टीनमध्ये मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे सापडल्याचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित करताना १२ १२ तास अधिकारी, कर्मचारी काम करत असतात त्यांच्या शाकाहारी जेवणात चिकनचे तुकडे सापडत असतील तर हा त्यांच्या भावनेचा, श्रध्देचा अपमान आहे.

- Advertisement -

महाबळेश्वर, लोणावळा याठिकाणी संबंधित खात्याने धाडी टाकल्या आहेत. कालच एक लक्षवेधी झाली त्यामध्ये रसवंतीगृहात ८० टक्के बर्फ हा दुषित पाण्यापासून तयार केला जात आहे ही गंभीर बाब आहे. बेजबाबदारपणा आहे असेही अजितदादा पवार म्हणाले.

आज लोकांना कळेना कुठल्या हॉटेलमध्ये जावून खावे, खावे तर काय खावेआरोग्याला आज धोका निर्माण झाला आहे. कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या लोकांना जन्मठेपेची शिक्षा द्यावी. त्याशिवाय हे शहाणे सरळ होणार नाही त्यामुळे सरकार यावर काय करणार असा सवालही अजितदादा पवार यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -