पुण्यातील हवामानात अचानक झाला ‘हा’ बदल

पुण्यात अचानक उन आणि पाऊसाचा खेळ सुरु झाला आहे. शहरातील काही परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. या घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे.

Pune
Pune
पुण्यात अवकाळी पाऊस

पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी दुपारी चारच्या सुमारास अचानक उन आणि पाऊसाचा खेळ सुरु झाला. यामुळे दीपावली सणानिमित्त खरेदी करणाऱ्या नागरिकांची धावपळ उडाली.गेल्या काही दिवसांपासून शहरात दमट वातावरण होते.नागरिक घामाघूम झाले,सोमवारी दुपारी अचानक एका दिशेला पाऊस झाला तर दुसऱ्या दिशेला उन होते यामुळे नागरिकांना ऊन आणि पावसाचा आनंद घेता आला.परंतू अनेक नागरिकांचा अवघा दहा मिनिटं हलक्या सरी कोसळल्याने खरेदीचा खोळंबा झाला.तर घामाघूम झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.

विज अंगावर कोसळून तिघांचा मृत्यू

रविवारी रात्री उशिरा शहरात परिसरात जोरदार पाऊस झाला आहे.तर मावळ परिसरात जोरदार पाऊस कोसळला यात वीज अंगावर पडून तिघांचा मृत्यू झाला.रविवारी सायंकाळी पुण्याच्या कामशेत येथे तीन शेतकऱ्यांवर वीज पडल्याने मृत्यू झाला.खंडू धोंडू शिरसाठ वय-५५,शोभा अंकुश शिरसाठ-३५,दोघे हि रा.नेवासे ता.मावळ जि.मावळ आणि सुनंदा भाऊ कचरे वय-३८ रा.कचरेवाडी ता.मावळ जि.पुणे अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

भावकीतल्या खंडू आणि शोभा हे दोघे त्यांच्या नेसावे गावातील शेतात गेले होते. आपापल्या शेतात काम सुरू असतानाच पाऊस आला म्हणून दोघांनी एकाच झाडाचा आसरा घेतला. तर कचरेवाडी गावातील सुनंदा या पाऊसच्या भीतीनं शेतातील भाताचा पेंडा झाकत होत्या.याच घाईत सायंकाळी विजांचा कडकडाट झाला आणि घात झाला यात सुनंदा यांची उजवी बाजू पूर्ण जळाली. तर झाडाखाली थांबलेल्या खंडू यांच्या हातावर आणि शोभा यांच्या पाठीमागून खांद्यावर वीज पडली.या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला.याप्रकरणी कामशेत पोलीस आणि मावळ तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.दिवाळीच्या पहिल्याच दिवशी तिघांच्या मृत्यूने तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here