घरमहाराष्ट्र४-५ दिवसांत राज्यात मान्सून सक्रिय होणार

४-५ दिवसांत राज्यात मान्सून सक्रिय होणार

Subscribe

नैऋत्य मान्सून येत्या चार ते पाच दिवसांत राज्यात सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. येत्या दोन दिवसात भारताच्या दक्षिण पश्चिम भागात मान्सून अधिक वेगाने प्रवेश करण्याचे संकेत आहेत. येत्या २४ तासांमध्ये उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मान्सूनसाठी आता पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कर्नाटक, तामिळनाडू, पाँडेचेरी, करईकल यांसारख्या पट्ट्यात मान्सूनचा वेग वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. प्रादेशिक हवामान विभागाने मान्सून हा केरळमध्ये १ जूनला दाखल होईल, असा अंदाज मांडला होता. तर मुंबईत ११ जूनला मान्सून दाखल होईल, असे संकेत दिले होते. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि कर्नाटक या ठिकाणी पाऊस आणि वादळीवारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हे प्रमाण कमी अधिक असेल, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

येत्या चार ते पाच दिवसात मात्र गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर केरळ, कोकण, कर्नाटक आणि गोवा या ठिकाणी येत्या २४ तासात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि दक्षिण राजस्थान यासारख्या भागात कमी अधिक प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -