करोना व्हायरस : करोनावर मात करण्यासाठी २२ हजाराहून अधिक खोल्या सज्ज

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्यभरात तब्बल २२ हजार ११८ खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Mumbai
ashok chavan
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण

करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्यभरात तब्बल २२ हजार ११८ खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी ५५ हजार ७०७ खाटांची सोय होऊ शकेल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी दिली.

करोनाचा लढाईसाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. राज्य सरकारने सर्व प्रकारची तयारी केली आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या शेकडो शासकीय इमारतीमधील २२ हजार ११८ खोल्या प्रशासनासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये विश्रामगृहे, वसतिगृहे आणि नवीन बांधकाम झालेल्या मात्र अद्याप लोकार्पण न झालेल्या शासकीय इमारती आदींचा समावेश आहे.

अशा असतील सुख-सुविधा

याठिकाणी वीज, पाणी अशा सुविधा उपलब्ध असतील. या खोल्यांचा वापर विलगीकरण तसेच तात्पुरत्या स्वरूपातील रुग्णालय म्हणून केला जाऊ शकतो. आपत्कालीन यंत्रणेने यातील अनेक इमारतींचा वापर ही सुरु केला आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार हे कर्मचारी आवश्यक त्यावेळी उपलब्ध असतील अशीही माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here