Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी भंडारा दुर्घटना: चौकशीतून सत्य बाहेर येईल - मुख्यमंत्री

भंडारा दुर्घटना: चौकशीतून सत्य बाहेर येईल – मुख्यमंत्री

भंडारा येथे घडलेली दुर्घटना अत्यंत भीषण आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. ही घटना कशी घडली याची सध्या चौकशी सुरु आहे.

Related Story

- Advertisement -

‘भंडारा येथे घडलेली दुर्घटना अत्यंत भीषण आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. ही घटना कशी घडली याची सध्या चौकशी सुरु आहे. त्यामुळे चौकशीतून सत्य बाहेर येईलच. पण, अशी दुर्घटना पुन्हा राज्यात घडणार नाही, याकरता प्रयत्न केले जाणार आहे. तसेच या दुर्घटनेत दोषींवर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल’, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

- Advertisement -

‘भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीची सखोल चौकशी करण्यात येईल. कुठलीही कसर ठेवण्यात येणार नाही आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भंडारा येथे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी नागपूरहून भंडारा येथील भोजापूर येथे जाऊन विश्वनाथ आणि दीपा बेहेरे या दाम्पत्याची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘आग प्रकरणी एक टीम चौकशी करीत असून मुंबई अग्निशमन विभाग प्रमुख पी.एस. रहांगडाले यांना देखील यात सहभागी करून घेण्याचे निर्देश मी दिले आहेत’.

सरकारी रुग्णालयाचे ऑडीट करण्याचे आदेश

राज्यातील सर्व खासगी आणि सरकारी रुग्णालयातील सेफ्टी ऑडिट करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले आहेत. यासाठीचे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले गेले आहेत.

पाच लाखांची मदत आणि चौकशीचे आदेश

- Advertisement -

भंडार्‍यातील जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. दरम्यान, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मृत बालकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.


हेही वाचा – माझी सुरक्षा कमी करा – शरद पवार


 

- Advertisement -