घरताज्या घडामोडीपुत्रवियोगातून जन्मदात्रीने घेतला जगाचा निरोप

पुत्रवियोगातून जन्मदात्रीने घेतला जगाचा निरोप

Subscribe

मालेगावातील दोन धक्कादायक घटनांनी हळहळ

पुत्रवियोगाच्या धक्क्याने जन्मदात्रींनी काही वेळातच जगाचा निरोप घेतल्याच्या सलग दोन घटना मालेगावी घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

मालेगाव शहरातील हाजी अब्दुल रशीद अब्दुल रज्जाक ऊर्फ राशनवाला यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. मात्र हा वियोग सहन न झाल्याने अवघ्या अर्ध्या तासातच त्यांच्या मातोश्रींनीही (शमशादबी) प्राण त्याग केला. दुसर्‍या घटनेत प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका डी. के. अंजुम यांचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यांचे पुत्र आसिम शेख अब्दुल करीम यांचा मृत्यू होताच त्यांनाही हृदयविकाराचा धक्का बसला. २०१८ मध्ये घडलेल्या एका घटनेत स्वत:सह परिवाराचा जीव धोक्यात घालत जिंतूर येथील एका परिवाराचे प्राण वाचवले होते. शहरातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच त्यांच्या मातोश्री शमशादबी (७०) यांनीही प्राणत्याग केला. या दोन्ही घटनांनी मालेगावी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -