घरमहाराष्ट्रजावयाच्या आत्महत्येला सासू, मेव्हुणा जबाबदार

जावयाच्या आत्महत्येला सासू, मेव्हुणा जबाबदार

Subscribe

साडू च्या मुलाचा आज विवाह असून ते होणार की नाही त्याच्यावर मात्र प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे.

सासू आणि मेहुण्यांच्या जाचाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. सासू आणि मेहण्यावर सांगवी पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश लोखंडे अस आत्महत्या केलेल्या जावयाचे नाव आहे. सासू श्रीमती दुर्गाबाई शिंदे, मेहुणा समाधान शिंदे, सचिन शिंदे यांच्यासह साडू महेश लोखंडे आणि त्याचा मुलगा (नवरदेव) गणेश लोखंडे अस आरोपींचे नाव आहेत. साडू च्या मुलाचा आज विवाह असून ते होणार की नाही त्याच्यावर मात्र प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे. याप्रकरणी विनोद लोखंडे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुरेश यांची पत्नी छाया या चाकण येथे माहेरी राहातात. त्यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद होते, त्यांचं पटत नव्हतं. मयत सुरेश यांचा साडू आरोपी महेश लोखंडे याचा मुलगा आरोपी गणेश लोखंडेचा लग्न सोहळा आज रोजी होता. त्यामुळे सुरेश ची पत्नी छाया, तीन मुलं, सासू आणि दोन मेहुणे हे गेल्या बुधवारी पिंपळे गुरव परिसरातील राहते घरी आले होते. तेव्हा, मयत सुरेश हा मुलांना भेटायला गेले असता त्यांची पत्नीने भेटू दिले नाही. त्यांच्यात बाचाबाची होऊन वाद झाला तेवढ्यात सासू, साडू, मेहुणे आणि नवरदेव यांनी सुरेश ला बेदम मारहाण केली.

- Advertisement -

त्यानंतर नवरदेवासह आरोपींनी सुरेश च्या घरी येऊन लग्न झाल्यानंतर बघून घेऊ अशी धमकी दिली होती अस फिर्यादीत म्हटलं आहे. सुरेश तणावात आला होता, तो घाबरला होता यातूनच त्याने शनिवारी सकाळी पाऊने आठ च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. सासू ला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. तर सर्व आरोपी फरार आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -