‘उद्धवजी त्या संजय राऊताच्या जिभेला लगाम घाला’ – छत्रपती संभाजीराजे

Mumbai
sambhajiraje bhosale and sanjay raut
खासदार संभाजीराजे भोसले आणि खासदार संजय राऊत

भाजपचे नेत्यांनी आज दिल्लीतील भाजप मुख्यालयात आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. या पुस्तकावर चहुबाजूंनी टीका होत असताना भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी देखील भाजपला खडे बोल सुनावले आहेत. तसेच शिवाजी महाराजांच्या वशंजांना प्रश्न विचारणाऱ्या संजय राऊत यांच्यावर देखील संभाजीराजेंनी टीका केली आहे. ‘उद्धवजी त्या संजय राऊतच्या जिभेला लगाम घाला’, अशी संतप्त प्रतिक्रिया संभाजीराजेंनी ट्विटरवर व्यक्त केली आहे.

संजय राऊत यांनी देखील दिले प्रत्युत्तर

खासदार संभाजीराजे यांनी ट्विट केल्यानंतर त्याला संजय राऊत यांनी लगेचच उत्तर दिले आहे. “मा. छत्रपती संभाजी राजे आम्ही आपला नेहमीच आदर करतो.. संजय राऊत यांनी असे कोणते विधान केले? ज्यामुळे छत्रपती घराण्याचा अवमान झाल? हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानेच चालत आहे. सदैव चालत राहिल. धन्यवाद आणि जय महाराष्ट्र” असे संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

हे वाचा – माझ्यावर रागवण्यापेक्षा वशंजांनी भाजपचा राजीनामा द्यावा – संजय राऊत

 

काय म्हणाले होते संजय राऊत

“शिवाजी महाराजांचा एकेरीत ऊललेख करून या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजां बरोबर केली हे भाजपात शिरलेलया छत्रपतीचया वंशजांना मान्य आहे का?” असा प्रश्न राऊत यांनी ट्विटरवर विचारला होता. ही टीका खासदार संभाजीराजे भोसले यांना चांगलीच जिव्हारी लागल्याचे यातून दिसून येत आहे. त्यातूनच त्यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.

ते पुस्तक तात्काळ मागे घ्या, नाहीतर… – छत्रपती संभाजीराजे

संजय राऊत यांनी माहिती न घेता, वक्तव्य केले असल्याचे संभाजीराजे यांचे म्हणणे आहे. कारण आज जिजाऊ जयंतीनिमित्त संभाजीराजे हे सिंदखेड राजाला गेले होते. त्याठिकाणी भाषण करत असताना त्यांनी या पुस्तकाचा निषेध केला होता. “छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही करणं खपवून घेतलं जाणार नाही. नरेंद्र मोदी हे स्वकर्तृत्वाने पंतप्रधान झाले आहेत, पण त्यांची शिवाजी महाराजांशी तुलना करणं माझ्यासाहित सर्वच शिवभक्तांना अजिबात आवडलेलं नाही. ज्या पक्षाच्या कार्यालयात ह्या पुस्तकाचे प्रकाशन झाले, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी ते पुस्तक तात्काळ मागे घ्यावे. नाहीतर त्याचे वेगळे परिणाम होतील.” असा इशाराचा त्यांनी भाजपला दिला आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here