घरमहाराष्ट्रMPSC Exam : नोव्हेंबरमधील परीक्षाही पुढे ढकलल्या; आयोगाची पत्रकाद्वारे माहिती

MPSC Exam : नोव्हेंबरमधील परीक्षाही पुढे ढकलल्या; आयोगाची पत्रकाद्वारे माहिती

Subscribe

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे १ नोव्हेंबर २०२० आणि २२ नोव्हेंबर २०२० रोजी होणाऱ्या परीक्षादेखील रद्द करण्यात आल्या असून त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा रद्द करुन पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा कधी होणार त्याच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आल्या नसल्याचे सांगत लवकरच त्या जाहीर करू, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हटले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे.

- Advertisement -

यापूर्वी राज्यातील ११ ऑक्टोबरला होणाऱ्या एमपीएसच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. राज्य सरकारच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून MPSC परीक्षा पुढे ढकलली असल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर ११ ऑक्टोबरला होणाऱ्या एमपीएससी परीक्षेविरोधात मराठा समाज आक्रमक झाला होता. ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत होती. मराठा आरक्षणाबाबत आक्रमक झालेले संभाजीराजे छत्रपती यांनीही परीक्षा रद्द न झाल्यास एमपीएससीच्या केंद्रे ताब्यात घेण्याचा इशारा दिला होता.

हेही वाचा –

माझ्या हिंदुत्वाला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही; मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -