स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई हायअ‍ॅलर्ट

Mumbai
मुंबई हायअ‍ॅलर्ट

जम्मू- काश्मीरमधील कलम 370 काढल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह देशातील १५ मोठ्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणाने दिला होता. त्यामुळे स्वातंत्रदिनानिमित्त मुंबईतील रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. मध्य रेल्वेवर 300 तर पश्चिम रेल्वेवर एक हजार रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाचे अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत.

स्वातंत्र्यदिना निमित्त उपनगरीय रेल्वे सुरक्षेसाठी आरपीएफ आणि जीआरपी सज्ज झाले आहे.आरपीएफने उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रमुख रेल्वे स्थानकांमधील सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. प्रत्येक ठिकाणाची तपासणी केली जात आहे. तसेच प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर किंवा लोकलमध्ये संशयित प्रवासी, संशयित वस्तू दिसल्यास सुरक्षा विभागाला कळविण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे. उपनगरीय रेल्वेच्या सर्व स्थानकांवर सुरक्षा व्यवस्थेची तपासणी केली जात आहे.

रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल यांच्यावतीने पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल, दादर आणि मध्य रेल्वे मार्गावरील घाटकोपर, भांडुप स्थानकावर तपासणी करण्यात येत आहे. उपनगरी रेल्वे स्थानकांवर सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर फटका गॅग आणि रेल्वे परिसरात होणार्‍या गुन्ह्यांवर नजर ठेवण्यासाठी मध्य रेल्वेवर 300 तर आणि पश्चिम रेल्वेवर एक हजार अतिरिक्त आरपीएफ आणि जीआरपी तैनात करण्यात आले आहेत.

गर्दीच्या स्थानकावर विशेष नजर
मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर रेल्वेकडून अतिदक्षता घेणात येत आहे. सीएसएमटी, दादर, वांद्रे, कुर्ला, ठाणे यांसारख्या मोठ्या स्थानकांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात येत आहे. या रेल्वे स्थानकांवर रेल्वे सुरक्षा बल, महाराष्ट्र सुरक्षा बल, होमगार्ड, श्वान पथकांद्वारे तपासणी केली जात आहे.

इम्रान खान यांची भारताला युद्धाची धमकी

काश्मीरमधील ३७० कलम हटवल्यानंतर भारताशी युद्ध करण्याची भाषा करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आता नरमले आहेत. त्यांना भारताच्या ताब्यातील काश्मीरपेक्षा आता आपल्या ताब्यातील काश्मिरची चिंता वाटू लागली आहे. भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसणाच्या प्रयत्न केला तर युद्ध करू अशी धमकी इम्रान खान यांनी दिली आहे.

बुधवारी पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन. त्यानिमित्ताने इम्रान खान पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेले होते. त्यांनी तेथील संसदेला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप केवळ काश्मीरवर थांबणार नाहीत. ते लवकरच पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसतील. भारताने बालाकोटमध्ये हल्ला केला होता. आता ते पाकव्याप्त काश्मीर मिळवण्यासाठी प्रयत्न करतील, अशी भीती इम्रान खान यांनी व्यक्त केली.

ही भीती व्यक्त करताना इम्रान खान तेवढ्यावर थांबलेले नाहीत. त्यांनी भारताला युद्धाची धमकी दिली आहे. भारत पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसल्यास आम्ही युद्ध करू. हे युद्ध झाले तर त्याला संयुक्त राष्ट्र जबाबदार असेल, असे इम्रान खान म्हणाले. काश्मीरसाठी गरज पडल्यास आम्ही आंतरराष्ट्रीय न्यायालयातही जाऊ. येत्या काळात लंडनमध्ये मोठी रॅली काढण्यात येईल. संयुक्त राष्ट्रांची महासभा सुरू असताना पाकिस्तान विरोध करेल, असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे.

भारतीय लष्कर कोणत्याही प्रकारच्या आव्हानांसाठी सज्ज आहे. पाकिस्तानने युद्धाचे दु:साहस केले तर त्यांना जशासतसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दिला आहे.