घरमहाराष्ट्रकोरोनामुळे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला सहा महिन्यांचा उशिर

कोरोनामुळे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला सहा महिन्यांचा उशिर

Subscribe

प्रकल्प रखडल्याचा खर्चावर परिणाम नाही

कोरोना व्हायरसमुळे हिंदु ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग (मुंबई नागपूर समृद्धी महामार्गा) ची डेडलाईन सहा महिने पुढे गेली आहे. त्यामुळे डिसेंबर २०२१ ची पहिले उदिष्ट गाठता येणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून आज स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे आता नव्या डेडलाईननुसार हे काम १ मे २०२२ अखेरीस वाहतुकीसाठी खुला होईल. या प्रकल्पातील पहिला टप्पा म्हणजे नागपूर ते शिर्डी दरम्यानचा ५२० किमी अंतराचा टप्पा हा १ मे २०२१ रोजी सुरू होईल. तर डिसेंबर २०२१ पर्यंत हा मार्ग भिवंडीपर्यंत पुर्ण करण्यात येईल.

एकुण ७१० किमी लांबीच्या महामार्गात कोरोनाचा परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम काही महिन्यांसाठी लांबणीवर पडले आहे. स्थलांतरीत मजुरांसाठी ट्रेनची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात मजुर महाराष्ट्रातून आपल्या मुळ गावी गेले. पण कोरोनाचा प्रकोप कमी झाल्यानंतर आता मजुर समृद्धी महामार्गाच्या विविध पॅकेजमध्ये परतले आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली. लॉकडाऊनच्या काळात एरव्ही १८ हजार इतका असणारा मजुरांचा आकडा घसरत तो १० हजारांपर्यंत खाली आला होता. पण सद्यस्थितीला समृद्धीच्या विविध पॅकेजेसमध्ये एकुण २० हजार कामगार कार्यरत आहेत असे त्यांनी सांगितले. आतापर्यंत एकुण १५२ किलोमीटरचे काम पुर्ण झाले आहे. एकुण प्रकल्पाचे काम १५ पॅकेजमध्ये सुरू असून या प्रकल्पासाठी ५५ हजार ३३५ कोटी रूपये इतका प्रकल्पाचा खर्च आहे. तर ४० हजार कोटी रुपये अभियांत्रिकी कामांवर खर्च होणार आहे. महामार्गावर ८ बोगदे, व्हायाडक्ट्स, रेल्वेमार्गावरील पूल, नदीवरील पूल इत्यादी संरचनांचा समावेश असेल. वन्यप्राण्यांच्या संचारावर गदा येऊ नये यासाठी समृद्धी महामार्गावर वन्यजीवांसाठी अंडरपास आणि ओव्हरपास बांधण्यात येणार असल्याचेही मोपलवार यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

लॉकडाऊनच्या कालावधीत प्रकल्पाचे काम रखडले असले तरीही या प्रकल्पाचा परिणाम हा खर्च वाढण्यावर होणार नाही असे मोपलवार यांनी सांगितले. प्रकल्पाच्या नियोजित वेळेपेक्षा आधीच प्रकल्पाचे काम पुर्ण होत असल्याने प्रकल्पाचा खर्च वाढवण्यावर त्याचा परिणाम होणार नाही. सध्या सगळ्या पॅकेजेसमध्ये काम जोरात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -