घरमहाराष्ट्रमुंबई - नाशिक महामार्गावर ट्रक पलटी; मोठी वाहतूक कोंडी

मुंबई – नाशिक महामार्गावर ट्रक पलटी; मोठी वाहतूक कोंडी

Subscribe

केमिकल पावडर घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. या अपघातानंतर ट्रकमधील केमिकल पावडर रस्त्यावर पडली आहे. दरम्यान, ट्रक हटवण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.

मुंबई – नाशिक महामार्गावर ट्रकला अपघात झाला आहे. त्यामुळे या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. भिवंडीजवळ रांजणोली जंक्शनजवळील ओवळी गाव येथे ही घटना घडली आहे. केमिकल पावडर घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. या अपघातानंतर ट्रकमधील केमिकल पावडर रस्त्यावर पडली आहे. दरम्यान ट्रक रस्त्याच्या मधोमध पलटी झाल्यामुळे मुंबई – नाशिक महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ट्रक हटवण्याचे काम सध्या युध्दपातळीवर सुरु आहे.

ट्रक हटवण्याचे काम सुरु 

ट्रक अपघातामुळे मुंबई – नाशिक महामार्गावरील मोठी वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दोन्ही दिशेला वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. या अपघातानंतर ट्रकचे चाक तुटून बाजूला गेले असून ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून ट्रक हटवण्याचे काम सुरु आहे. लवकरात लवकर वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 

नाशिक : निफाडनजीक कादवा नदीत ट्रक कोसळून अपघात; चालकाचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -