घरमहाराष्ट्रयेत्या आठवड्यात धुवाधार पाऊस

येत्या आठवड्यात धुवाधार पाऊस

Subscribe

सध्या ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी पावसाच्या सरी तर लगेच पडणारे ऊन हे चित्र सध्या दिसत आहे. मात्र असे असताना देखील येत्या २२ ते २४ जुलै दरम्यान संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

मध्य महाराष्ट्रासह दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाने सध्या तरी उसंत घेतली आहे. गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या पावसाने मुंबईकरांची चांगलीच दमछाक झाली. मात्र थोड्या कालावधीसाठी विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा येत्या आठवड्यात जोरदार बॅटींग करणार असल्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त वर्तवली आहे. २२ ते २४ जुलै दरम्यान धुवाधार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात येत आहे.

ऊन पावसाचा खेळ

गेल्या चार दिवसांपासून पुण्सासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये जोरदार कोसळणाऱ्या पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या तर अचानक ऊन पडत आहे. यामुळे ऊन पावसाचा खेळ दिसून येत आहे. दोन दिवसांपासून पुण्यातही पाऊस आणि मध्येच ऊन असा ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. तसेच येत्या २२ ते २४ जुलै दरम्यान संपूर्ण राज्यात पाऊस पुन्हा एकदा हजेरी लावणार आहे. कोकण, पुणे आणि मध्य महाराष्ट्रात येत्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -