घरदेश-विदेशभाजपच्या सर्वाधिक उमेदवारांवर हत्येचे गुन्हे

भाजपच्या सर्वाधिक उमेदवारांवर हत्येचे गुन्हे

Subscribe

सोमवारी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी यश आजमावण्यासाठी रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपैकी हत्येच्या गुन्ह्यांची नोंद झालेल्या सर्वाधिक उमेदवारांची संख्या ही सत्ताधारी भाजपची असल्याचे स्पष्ट झाले असून, ती एकूण उमेदवारांच्या ३६ टक्के म्हणजे ही संख्या ५९ इतकी असल्याचे उघड झाले आहे. या खाली हत्येच्या गुन्ह्यातील उमेदवारांची संख्या ही भाजप खालोखाल काँग्रेस पक्षाची असून, ती ४४ असून, पक्षाच्या एकूण उमेदवारांच्या यादीत ती संख्या ५५ टक्के इतकी आहे. शिवसेनेच्या १२४ उमेदवारांपैकी ४४ जणांवर उपरोक्त गंभीर गुन्हे दाखल आहेत.

राष्ट्रवादीच्या अशा उमेदवारांची संख्या ३५ टक्के असल्याचे स्पष्ट झालेय. राज्यात होत असलेल्या १३व्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी यश आजमावणार्‍या उमेदवारांची संख्या ३३३७ इतकी असून, १०१६ इतक्या उमेदवारांविरोधी विविध गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यातील १९ टक्केे उमेदवारांविरोधी हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यांची नोंद आहे. यातील सर्वाधिक गुन्हेगार उमेदवार हे देशात पार्टी विथ डिफरन्सचा नारा लावणार्‍या भाजपचे असून, त्यांची संख्या ९६ आहे.

- Advertisement -

यातल्या ५९ उमेदवारांविरोधी हत्या आणि हत्या प्रकरणात हात असल्याचा आरोप आहे. प्रत्यक्ष हत्येच्या घटनेत भाजपच्या १९ उमेदवारांचा हात होता. त्यांच्या विरोधात विविध न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तर ६० उमेदवारांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याची नोंद आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये दुसरा क्रमांक हा काँग्रेस पक्षाचा असून, त्या पक्षाचे ४४जण गंभीर गुन्ह्यात अडकले आहेत. काँग्रेसची ही टक्केवारी ३५ टक्के असल्याचे स्पष्ट झालेय. शिवसेनेतील अशा गंभीर गुन्ह्यातील उमेदवारांची संख्या ४४ इतकी आहे. सेनेची ही टक्केेवारी ३५ आहे. तर राष्ट्रवादीच्या अशा उमेदवारांची संख्या ४३ आहे.

विनयभंगाचे गुन्हे असलेल्या उमेदवारांची संख्या ६७ असून, चौघांवर प्रत्यक्ष बलात्कार केल्याचा गुन्हा आहे. गुन्हेगार उमेदवारांची ही संख्या लक्षात घेऊन राज्यातल्या २८८ जागांपैकी १७६ मतदारसंघ हे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. ज्या मतदारसंघात किमान तीन उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल असतील तर आयोग याची गंभीर दखल घेत मतदारसंघ संवेदनशील म्हणून जाहीर करत असते. राज्यातल्या १७६ मतदारसंघांत गुन्हेगार उमेदवार आपले यश आजमावत असल्याचे स्पष्ट दिसते.

- Advertisement -

एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -