घरमहाराष्ट्रनगर-पुणे महामार्गावर अपघात; ३ ठार, १ जखमी

नगर-पुणे महामार्गावर अपघात; ३ ठार, १ जखमी

Subscribe

ट्रकला पाठीमागून आलेल्या स्कार्पिओ जीपने धडक दिल्याने अपघात

नगर-पुणे महामार्गावर पुण्याकडून नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर जातेगाव फाट्याजवळ उभ्या असणाऱ्या ट्रकला पाठीमागून आलेल्या स्कार्पिओ जीपने धडक दिल्याने आज हा भीषण अपघात झाला. या अपघातात तिन जणांचा मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी आहे.

- Advertisement -

 

अपघातातील सर्व धुळ्यातील रहिवासी

नगर-पुणे महामार्गावर झालेल्या या अपघातातील सर्वजण धुळ्यात राहणारे असून ओझायर तसनीय अख्तर अन्सारी (वय-३० रा. फिरदोस नगर, धुळे) फैसल गुलाब रब्बाली अन्सारी (वय-२० रा. मछली बाजार, धुळे) इरफान शयशोदोहा अन्सारी (वय-२० रा. मछली बाजार, धुळे) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत, तर अदनान निहाल अन्सारी (वय-२१ रा. तिरंगा चौक, धुळे) हा गंभीर जखमी आहे.

- Advertisement -

चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात

दरम्यान जातेगाव फाट्याजवळ उभ्या असणाऱ्या ट्रकला पाठीमागून स्कार्पिओ जीपने धडक देऊन झालेला अपघात पहाटेच्या झोपेत चालक असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झाला असल्याची माहिती सुपा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -